उद्धव ठाकरेंचे माजी सल्लागार अजोय मेहता आयकर विभागाच्या रडारवर
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार आणि माजी अधिकारी अजोय मेहता आयकर विभागाच्या रडारवर आहेत. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, बेनामी प्रॉपर्टीअंतर्गत अजय मेहता यांच्या नरिमन पॉइंट फ्लॅटशी संबंधित डीलचा प्राप्तिकर विभाग तपास करत आहे.अजोय मेहता यांनी मागील वर्षी हा 1076 चौरस फुटांचा फ्लॅट 5.33 कोटी रुपयांमध्ये खरेदी केला. 2009 मध्ये ही मालमत्ता अनामित्रा प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेडकडे होती, असे सांगण्यात आले होते. तेव्हा त्याचे मूल्य चार कोटी रुपये होते.
मिळालेल्या माहितीनुसार अजोय मेहता यांनी नरिमन पॉईंट परिसरातील फ्लॅट खरेदी केला होता, तो शेल कंपनी अनामित्र प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेडकडून खरेदी करण्यात आला. या कंपनीचे दोन भागधारक आहेत, जे मुंबईच्या चाळीत राहतात.
सूत्रांच्या माहितीनुसार, ही कंपनी केवळ हा करार करण्यासाठी तयार केली गेली. यामुळे प्राप्तिकर विभागाचा संशय या दिशेने गेला. या कंपनीच्या ताळेबंदात बरीच तफावत आहेत, तसेच भागधारकदेखील नॉन-फाइलर आहेत. यामुळे यात काहीतरी गडबड झाल्याचा संशय येतो.
अजोय मेहतांचे स्पष्टीकरण
कंपनीचा भागधारक कामेश नथुनी सिंग ज्यांच्याकडे 99 टक्के समभाग आहेत ते नॉन-फायलर आहेत. त्यांचा पत्ता ओबेरॉय मॉलजवळ देण्यात आला आहे, तर दुसरा भागधारक दीपेश रवींद्र सिंह आहे, ज्यांनी फक्त एकच रिटर्न भरला आहे, ज्यामध्ये उत्पन्न 1,71,002 रुपये देण्यात आले आहे. अशा परिस्थितीत कंपनीचे भागधारक अशा लोकांना दर्शविण्यात आहे ज्यांचे उत्पन्न कमी आहे आणि एवढ्या महागड्या प्रॉपर्टी सांभाळणे त्यांच्यासाठी कठीण आहे. या संपूर्ण वादावर अजोय मेहता यांनी इंडिया टुडेला प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, प्रॉपर्टीच्या मालकाची माहिती माझ्याकडे असण्याचे कोणतेही कारण नाही. हा कायदेशीर करार होता, जी योग्य मार्गाने करण्यात आली होती. आणि मी बाजारभावाप्रमाणे पैसे दिले. तरीही हे सर्व कुठून येत आहे याची त्यांना कल्पना नाही.
कोण आहे अजॉय मेहता?
Maha RERA चे अध्यक्ष गौतम चटर्जी यांचा कार्यकाळ संपल्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेतील 1984 बॅचचे अधिकारी अजॉय मेहता यांना अनेक मोठी नावे वगळून महारेराचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले. यापूर्वी ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून काम करत होते. यापूर्वी मेहता यांनी राज्याचे मुख्य सचिव, मुंबई महानगरपालिका आयुक्त, ऊर्जा सचिव इत्यादी महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 20, 2021, 6:26 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY