Pegasus: जेव्हा जेव्हा भारत पुढे जातो, तेव्हा असे कट शिजतात; फडणवीसांनी फेटाळले हेरगिरीचे आरोप
मुंबई : सध्या पेगासस स्पायवेअरची सगळीकडेच चर्चा आहे. इस्त्रायलच्या एनएसओ या फर्मवेअरने तयार केलेलं पेगासेस स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. इस्रायली फर्म पेगाससद्वारे आपल्या देशातील काही मंत्री तसंच पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आले असल्याचा दावा ‘द गार्डियन’ व ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये करण्यात आला. हेरगिरी करणाऱ्या या देशांच्या यादीत भारत सरकारचे नावही आहे. दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये या मुद्द्यावरुन प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत याविषयावरील आज दुपारी पत्रकार परिषदेत स्पष्ट शब्दांमध्ये आरोप फेटाळून लावले .
फडणवीस म्हणाले की, ‘पेगॅसस विषयीच्या बातम्यांना कुठलाही आधार नाही. हे सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीने देखील याविषयीचे वृत्त फेटाळले आहे. अधिवेशनाच्या एक दिवस पहिले दिवशी अशी बातमी देऊन भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याचा हा कट आहे. जेव्हा जेव्हा भारत पुढे जात आहे असे दिसते, तेव्हा काही लोक आपले हितसंबंध जपण्यासाठी भारताला बदनाम करण्याचा कट रचत असतात. मधल्या काळात काही मीडियांना चिनी फंडिंग असल्याचे वृत्तही आले होते. चिनी पैसा घेऊन ते भारतविरोधी अपप्रचार करत होते. याचा अर्थ स्पष्ट आहे. यामुळे या बातम्यावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. संसदेचे कामकाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 20, 2021, 6:09 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY