“याकरिता” मनसे आमदाराने मंत्री आदित्य ठाकरेंचे मानले आभार
ठाणे :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे जाहीरपणे आभार मानले आहेत. त्याचे कारण असे की, प्रदूषण करणाऱ्या कंपनीवर कारवाई झाल्यानंतर राजू पाटील यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरेंचे आभार मानले. डोंबिवलीमधील गांधीनगर नाल्यामध्ये रायबो फार्म या कंपनीकडून केमिकलचे पाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे नाल्यातील पाणी विषारी होऊन त्याला हिरवा रंग आला होता. दरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी कंपन्यांवर कारवाई केली होती.
डोंबिवलीमधील गांधीनगर नाल्यातून सांडपाणी हिरव्या रंगाचे होते. हे पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या हिरव्याजर्द नाल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यानंतर नाल्याच्या बाजूला असलेल्या रायबो फॅम या खाद्यरंग बनवणाऱ्या कंपनीतून हे सांडपाणी नाल्यात सोडले जात असल्याचे समोर आले. यानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकाराची दखल घेतली आणि संबंधित कंपनीवर कारवाईचे निर्देश दिले होते. यानंतर या प्रकरणाला आळा बसला.प्रदूषण करणाऱ्या कंपनीवर कारवाई केल्यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार मानले आहेत. ‘डोंबिवलीत प्रदूषण करणाऱ्या कंपनीवर त्वरित कारवाई केल्याबद्दल नियंत्रण बोर्ड व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार. यापुढे पण प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध अशीच त्वरित व कठोर कारवाई होईल हीच अपेक्षा.’ असे ट्विट मनसे आमदाराने केले आहे.
डोंबिवलीत प्रदूषण करणाऱ्या कंपनीवर त्वरित कारवाई केल्याबद्दल @control_board व पर्यावरण मंत्री @AUThackeray यांचे आभार. यापुढे पण प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध अशीच त्वरित व कठोर कारवाई होईल हीच अपेक्षा. pic.twitter.com/SMJ8MCe7ap
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) July 19, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 20, 2021, 4:40 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY