पांडुरंगा कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर कर, गजबजलेलं पंढरपूर पुन्हा पाहायचं आहे’ — मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचं विठूराया चरणी गाऱ्हाणं.
पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री क्षेत्र पंढरपुरात श्री विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा पार पडली. पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्मंत्र्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
तब्बल दोन तास सुरू असलेल्या या सोहळ्याला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे देखील उपस्थित होते. गेली 20 वर्षे विणेकरी म्हणून सेवा देणारे केशव कोलते आणि त्यांच्या पत्नी इंदुबाई यंदा मानाचे वारकरी म्हणून या महापूजेत सहभागी झाले होते. त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, बा विठ्ठला, कोरोनाला पळवून लाव… वारकऱ्यांवीना पंढरपूर नगरी सुनी सुनी वाटत आहे. खर तर प्रत्येक वर्षी हा परिसर वारकऱ्यांनी फुलून गेलेला असतो. पण याही वर्षी कोरोनचा प्रादुर्भाव असल्याने मंदिर परिसर सुन्न वाटतंय. वारकऱ्यांनी तुडूंब,आनंददायी, भगव्या पताक्यांनी भरलेलं पंढरपूर पहावयाचे आहे, असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले. आज मंदिरात मी वृक्षारोपण केले. हा परंपरेचा वृक्ष असून याची पाळेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
पंढरपूर नगरपरिषदेस राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या यात्रा अनुदानाच्या पाच कोटी रुपये रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 20, 2021, 2:49 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY