युवा वकिलावर तलवारीने जीवघेणा हल्ला, 3 जण पोलिसांच्या ताब्यात
मुंबई: मुंबईत एका वकिलावर तलवारीने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. बोरिवली भागात मारहाण करुन सत्यदेव जोशी यांच्यावर तलवारीने वार करण्यात आले. ही घटना मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाली आहे. मुंबईतील वकील सत्यदेव जोशी यांच्यावर तलवारीनं झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. मोबाइल कॅमेऱ्यात टिपल्या गेलेल्या दृश्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. वकिलावरील हल्ल्याची एकाच दिवसात दुसरी घटना समोर आली आहे.
मुंबईत दिवसाढवळ्या वकिलावर तलवारीने हल्ला, 3 जण पोलिसांच्या ताब्यात#advocate ,#Borivali ,#crimenews, #DAHISAR, #lawyer pic.twitter.com/aU4RZMZKJU
— Kaaltarang News Marathi (@kaaltarangnews) July 19, 2021
बोरीवलीच्या एम एच बी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८ जुलै रोजी ही घटना घडली होती.तलवार हल्ल्यात सत्यदेव जोशी गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी हत्येचा प्रयत्न, महाराष्ट्र हत्यारबंदी कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन अशा वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरून झाला हे समजू शकलेलं नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 19, 2021, 10:55 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY