शरद पवारांच्या आशीर्वादानेच मुख्यमंत्री शिवसेनेचा ; अमोल कोल्हेंचा इशारा
पुणे : शरद पवार यांचा वरदहस्त डोक्यावर आहे. म्हणून मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे, याचा विचार श्रेयासाठी धडपड करणाऱ्यांनी करावा. माजी खासदाराला काही काम नसल्यामुळे वाद, भांडणे लावण्याचे व श्रेय घेण्याचे काम ते करित आहेत. शरद पवारांमुळेच महाविकास आघाडी सरकार आहे. असा कडक इशारा राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना आज एका कार्यक्रमादरम्यान दिला.मात्र, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ना शरद पवार, ना मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना या रस्त्याचे श्रेय दिले नाही. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळेच रस्त्याचे काम झाल्याचे मान्य करण्याचा मनाचा मोठेपणा डॉ. कोल्हे यांनी दाखविला आहे.
मात्र त्यापूर्वीच म्हणजे शुक्रवारीच शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेना कार्यकर्त्यासह खेड व नारायणगाव रस्त्याचे उद्घाटन उरकून टाकले. हा रस्ता आपण मंजूर केला असून, आपणच याचे भूमिपूजन केले होते. अमोल कोल्हे केवळ दिखावा करत आहेत, असा दावा आढळरावांनी केला होता. त्यामुळे त्यांनी रस्त्याचे उद्घाटन करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. त्यांच्या टीकेला अमोल कोल्हे यांनी शनिवारच्या कार्यक्रमात उत्तर दिले. कोल्हे म्हणाले, खेड घाटाचे उद्घाटन हे कुठल्याही श्रेयवादाचा भाग नाही. श्रेय द्यायचे असेल तर ते नितीन गडकरी यांनाच द्यायला हवे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचे आता वय झाल्याने असा अनाधिकृतपणे उद्घाटन करण्याचा पोरकटपणा ते करीत आहे. बैलगाडा, विमानतळ,रेल्वे यावरून टीका करून माजी खासदार श्रेयवादासाठी धडपडत आहे. जुलै २० मध्ये या कामाची वर्क आॅर्डर झाली आहे. त्यानंतर दोन वेळा कामावर समक्ष भेट देऊन अनेक अडचणी दूर केल्या. त्यामुळेच काम लवकर पुर्ण झाले. आढळराव १५ वर्ष खासदार असूनही त्यांना चाकणची वहातूक कोंडी सोडविता आली नाही. बैलगाडा शर्यती, विमानतळ आणि रेल्वे या कामात फक्त आढळराव हे राजकारण करीत आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 17, 2021, 8:10 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY