दहावीच्या निकालावेळी संकेतस्थळावर उद्भवलेल्या त्रुटीच्या चौकशीसाठी समिती स्थापना,१५ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश.
पुणे : कोरोना संकटामुळे या वर्षी रद्द झालेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने लावण्याचा निर्णय घेतला. मात्र अचानक निकालाचे संकेतस्थळ कोलमडले. परिणामी निकाल घोषित केलेल्या वेळेपेक्षा तब्बल सहा-सात तास उशिराने विद्यार्थ्यांच्या हातात पडला. त्यामुळे आता निकालाच्या संकेतस्थळावरील तांत्रिक बिघाडाची सखोल चौकशी आता करण्यात येणार आहे. या परिस्थितीला जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांना समितीमार्फत होणाऱ्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
काय आहे प्रकरण :
दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता घोषित करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले होते. परंतु दुपारी एक वाजल्यानंतर संकेतस्थळावर तांत्रिक अडचणींमुळे निकाल पाहण्यात अडचणी येत होत्या. परिणामी राज्यातील १६ लाखांहुन अधिक विद्यार्थी, पालक, शिक्षकांना दहावीचा निकाल वेळेत पाहता आला नाही. त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. दरम्यान निकाल पाहण्यासाठी उत्सुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकांना मानसिक ताणाला सामोरे जावे लागले. त्यामुळे राज्य मंडळामार्फत दहावीचा निकाल घोषित करताना उद्भवलेल्या त्रुटींसंदर्भात चौकशी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने समिती स्थापन केली आहे.यापूर्वी दहावी निकालाच्या वेबसाईटला अशी अडचण निर्माण झाली नव्हती. यावेळी मात्र निकाल जाहीर होऊनही वेबसाईटवर अनेक तास निकालच पाहता आला नाही. त्यामुळे ही वेबसाईट हॅक केल्याचा शिक्षण विभागला संशय आहे.
शिक्षण आयुक्त विशाल सोंळकी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन कार्यरत असले. यात माहिती व तंत्रज्ञान विभगाचे सचिव, उद्योग उर्जा व कामगार विभागाचे उपसचिव (उद्योग), शालेय शिक्षण विभागाचे तांत्रिक सल्लागार हे सदस्य, तर शिक्षण आयुक्त कार्यालयातील उपसंचालक (प्रशासन) हे सदस्य सचिव सहभागी असतील. या प्रकरणाची सखोल चौकशी करून समितीला येत्या १५ दिवसांत राज्य सरकारला अहवाल सादर करावा लागेल, असे आदेश शालेय शिक्षण विभागाचे सह सचिव राजेंद्र पवार यांनी दिले आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 17, 2021, 7:37 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY