Breaking News

दिल्लीत मोदी – पवार गाठीभेटींबाबतचे “रहस्य” उलगडले,नवाब मलिक यांनी दिली माहिती, म्हणाले…

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: July 17, 2021 7:06 pm
|

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रपतीपदाच्या वावड्या दिल्ली – मुंबईत उडविण्यात आल्यानंतर पवार आधी राज्यसभेचे नेते पियूष गोयल यांना भेटले. त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली आणि त्यानंतर आज पवारांनी साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. जवळपास एक तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून या भेटी मागचे नेमके कारण सांगण्यात आले.

दरम्यान, ही भेट, भेटीतील तपशील आणि प्रसारमाध्यमांतून आलेल्या बातम्या या सर्वांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकारपरिषदेत माहिती दिली. देशभरातील सहकारा क्षेत्राचे काही प्रश्न आहेत. केंद्र सरकारने सहकारी बँकांसदर्भात कायद्यामध्ये काही बदल केले आहेत. त्या बदलाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. केंद्राने कायद्यात केलेल्या बदलामुळे सहकारी बँका आहेत त्यांचे अधिकार कुठे ना कुठे मर्यादित करून आरबीआयला जास्त अधिकार त्यामध्ये देण्यात आले. सहकार हा राज्याचा विषय आहे. घटनेत बदल करून याला स्वायत्ततेचा अधिकार दिला गेला. त्यामुळे या संदर्भात शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना पत्रकही सादर केलं. दरम्यान, काही प्रसारमाध्यमं मात्र अत्यंत चुकीचे वृत्त देत आहेत. शरद पवार आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते दिल्लीत भेटले असल्याचेही वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे. परंतू, हे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले.

याचबरोबर, पण या भेटीच्या आधी शरद पवारांनी पियुष गोयल यांची भेट घेतली होती. नुकतीच पियुष गोयल यांची राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यानंतर पियुष गोयल यांनी देशातील काही प्रमुख नेत्यांसोबतच शरद पवारांशी देखील चर्चा केली होती. त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची देखील शरद पवारांनी भेट घेतली होती. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी संरक्षणमंत्री काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए. के. अँटोनी यांची बैठकीत उपस्थिती होती आणि याच बैठकीत लष्करप्रमुख बिपीन रावत, जनरल नरवणे देखील उपस्थित होते. सीमेवर ज्या प्रकारीच परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याबाबत सरकारकडून माहिती दिली गेली. याचबरोबर अशी परिस्थिती हातळण्यासंदर्भात काही महत्वपूर्ण चर्चा देखील झाली असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: July 17, 2021, 7:06 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *