माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाची 4.20 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त
मुंबई : 100 कोटी कथित वसुलीप्रकरणाच्या आरोपावरुन माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) अडचणीत सापडले आहेत. देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना (Anil Deshmukh PA) ईडीने (ED) अटक केल्यानंतर, आता स्वत: अनिल देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती . स्वीय सहाय्यकांच्या केलेल्या चौकशीमधून समोर आलेल्या माहितीच्या आधारे ईडीने ही कारवाई केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. 100 कोटी वसुलीप्रकरणामध्ये ईडीने ही पहिलीच मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे अनिल देशमुखांच्या अडचणी या वाढल्या आहेत. ईडीने अनिल देशमुखांच्या नागपुरातील संपत्तीवर जप्ती आणली असल्याचे वृत्त आहे.
ईडीने देशमुखांच्या घरांवर टाकले होते छापे
गेल्या काही दिवसांपूर्वीच अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील निवासस्थानी ईडीने छापेमारी केली होती. यावेळी दिवसभर ईडीच्या अधिकाऱ्यांनी देशमुखांच्या घराची झडती घेतली होती. तसेच त्यांना अनेक प्रश्नही विचारण्यात आले होते. ही कारवाई झाल्यानंतर संध्याकाळी माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसेच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरच आरोप केले होते. तसे आपण ईडीला संपूर्ण सहकार्य करत असल्याचेही देशमुख म्हणाले होते.
परमबीर सिंहांच्या लेटर बॉम्बनंतर देशमुख अडचणीत
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख एपीआय सचिन वाझे याला वसुली करायला सांगत होते. देशमुख यांनी वाझेला महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीच टार्गेट दिले असल्याचा आरोप परमबीर सिंहांनी यांनी केला आहे. तसेच या पत्राच्या आधारावर मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे. त्या जनहित याचिकेमध्ये मुंबई हायकोर्टाने चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 16, 2021, 4:07 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY