महाराष्ट्रातील रुग्णवाढ देशासाठी चिंतेचा विषय- पंतप्रधान
नवी दिल्ली : कोविडचा धोका अजून टळलेला नाही. उलट काही राज्यांमध्ये नव्या व्हेरिएंटने रूग्णसंख्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी उपाययोजनांबाबत चर्चा केलीआहे. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसह तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशा आणि केरळ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश होता. बैठकीदरम्यान, आपल्याला चाचणी, ट्रॅक, उपचार आणि लसीकरणावर विशेष लक्ष द्यावे लागेल असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ज्या राज्यांत कोरोनाचे नवीन प्रकरणे वाढत आहे. तेथे सक्रिय उपायोजना करत कोरोनाची संभाव्य तिसरी रोखणे गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.यापूर्वी मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी पूर्वेकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तेव्हा सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणारे आणि बाजारांमध्येही मास्क न घालताच फिरणाऱ्या लोकांच्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली.
कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना पंतप्रधान म्हणाले की, तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. आज चर्चेत जे राज्ये सहभागी आहेत, तेथे एकूण कोरोनाबाधितांपैकी 80 टक्के रुग्ण सापडले आहेत. तसेच 84 टक्के मृत्यू याच सहा राज्यांमधील आहेत. महाराष्ट्र आणि केरळमधील वाढती रुग्णसंख्या संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय ठरली आहे.
ते पुढे म्हणाले की, बऱ्याच दिवस कोरोनाचे प्रकरणे वाढत राहिल्यास व्हायरसमध्ये म्यूटेशनची शक्यता वाढत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे आणखी नवीन धोका निर्माण होऊ शकतो. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी कडक उपायोजना करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्याने जे काम केले तेच आपल्याला करायचे आहे. त्यासाठी टेस्टेड अँड प्रूव्हन मेथर्ड वापरावी लागेल असे ते म्हणाले.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 16, 2021, 1:30 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY