Breaking News

ओबीसी आरक्षणावरून राडा :महाराष्ट्राच्या भविष्यासाठी हे चालणार नाही आणि आम्ही चालू देणार नाही!: रोहित पवार

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: July 5, 2021 4:21 pm
|

मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी इम्पेरिकल डेटा केंद्राकडून मिळावा असा ठराव मांडला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका मांडली. यानंतर भुजबळांनी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी उज्ज्वला गॅससाठी डेटा वापरला जातो, मग ओबीसींच्या आरक्षणासाठी का दिला जात नाही, असा प्रश्न भुजबळांनी उपस्थित केला. यावर फडणवीसांनी हरकतीचा मुद्दा मांडला. परंतु तालिका अध्यक्षांनी फडणवीसांचा हरकतीचा मुद्दा स्वीकारला नाही. अध्यक्षांनी भुजबळांना बोलण्यास सांगितल्यानं भाजपचे आमदार आक्रमक झाले. भाजपच्या आमदारांनी अध्यक्षांच्या समोर वेलमध्ये येऊन जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर एका आमदाराने अध्यक्षांचा माईक ओढला. या गदारोळात धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.

रोहित पवार म्हणाले एक खालच्या पातळीवर बोलत सुटलेत… तर काही चक्क मारायलाही लागले…आणि भाजपचे इतर सगळे नेते या लोकांना पाठीशी घालून शांत बसलेत! ही आहे का महाराष्ट्राची संस्कृती? महाराष्ट्राच्या भविष्यासाठी हे चालणार नाही आणि आम्ही चालू देणार नाही! असे त्यांनी भाजपाला सुनावले आहे.

ते म्हणाले , भाजप नेत्यांनी किमान आता तरी आरक्षण प्रश्नी राजकारण न करता ओबीसी आणि मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी हातभार लावावा.विरोधी पक्षनेत्यांनी सत्तेत असताना ज्या इंपीरिकल डाटा चं महत्व पटवून सांगितलं, आज मात्र तो डाटा काही कामाचा नाही असे सांगत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु भुजबळ साहेबांनी एक एक मुद्दा स्पष्ट करत भाजपची खरी वृत्ती समोर आणली.#OBCreservation पूर्ववत करण्यासाठी आवश्यक असलेला इंपीरिकल डाटा केंद्राकडून लवकरात लवकर मिळावा यासाठी सभागृहात आज राज्य सरकारने ठराव मांडला. परंतु हा ठराव मांडताना भाजपने केलेला विरोध हा त्यांचा खरा चेहरा दाखवणारा असल्याचे रोहित पवार म्हणाले.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: July 5, 2021, 4:21 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *