Mansoon Session 2021 : विधानसभेत तुफान राडा ; तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन, वाचा सविस्तर…
मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान गदारोळ उडाला. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात राडा पाहायला मिळाला.राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी इम्पेरिकल डेटा केंद्राकडून मिळावा असा ठराव मांडला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका मांडली. यानंतर भुजबळांनी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी उज्ज्वला गॅससाठी डेटा वापरला जातो, मग ओबीसींच्या आरक्षणासाठी का दिला जात नाही, असा प्रश्न भुजबळांनी उपस्थित केला. यावर फडणवीसांनी हरकतीचा मुद्दा मांडला. परंतु तालिका अध्यक्षांनी फडणवीसांचा हरकतीचा मुद्दा स्वीकारला नाही. अध्यक्षांनी भुजबळांना बोलण्यास सांगितल्यानं भाजपचे आमदार आक्रमक झाले. भाजपच्या आमदारांनी अध्यक्षांच्या समोर वेलमध्ये येऊन जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर एका आमदाराने अध्यक्षांचा माईक ओढला.
या गदारोळात सत्ताधारी तसेच भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. एवढेच नव्हे तर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात आलाय. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेत गोंधळ निर्माण केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ हे आमदार गोंधळ घालत होते. या संपूर्ण प्रकरणावर माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे खोटे आरोप केले गेले आहेत. ओबीसी आरक्षणासाठी आम्ही आमच्या 12 आमदारांचे बलिदान देण्यास तयार आहोत.निलंबनावर महाराष्ट्र भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले की, ठाकरे सरकार ‘तालिबान’ सारखे वागत आहे. मी या कृतीचा निषेध करतो. भास्कर जाधव यांना मी किंवा अन्य कोणत्याही आमदारांनी शिवीगाळ केली नाही. भाजपच्या सदस्यांपैकी कोणीही केबिनला शिवीगाळ केली नाही. मी त्याला माफी मागितली तरीसुद्धा त्याने आम्हाला निलंबित केले.. आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत, कीर्तिकुमार बगाडिया या आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन झालं आहे. या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती आज विधानसभेत दिली.
या घटनेनंतर शिवसेना आणि भाजपमधील संबंध अस्वस्थ होऊ शकतात, ज्याविषयी दररोज नवीन बातम्या समोर येत आहेत. आज शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले होते की, भाजपचे आमिर खान आणि किरण राव यांच्यासारखे संबंध आहेत, भारत-पाकसारखे नाहीत. आमचे राजकीय मार्ग भिन्न आहेत, नक्कीच पण मैत्री कायम राहील. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, भाजप आणि शिवसेना यांच्यात वैर नाही. नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान मोदींशी भेट घेतल्यानंतर भाजप-शिवसेनेच्या संबंधांबद्दल सकारात्मक वक्तव्य केले. असें, असेंब्लीवरून निलंबनासाठी होणारी ही लढाई महाराष्ट्राच्या राजकारणात काय रंगत आहे, हे फक्त काळच सांगेल.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 5, 2021, 4:06 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY