Breaking News

औरंगाबादेत नियम धाब्यावर बसून लुटला आनंद, एकानेही घातला नव्हता मास्क, ५० जणांवर गुन्हे दाखल मात्र खासदार नामानिराळे

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: July 5, 2021 1:23 pm
|

औरंगाबाद: खासदार इम्तियाज व त्यांच्या समर्थकांनी औरंगाबादेत नियम धाब्यावर बसवून दाैलताबादेतील अंबर फार्महाऊसवर ३ जुलै राेजी रात्री झालेल्या मैफलीत आपल्या अनेक समर्थकांसह हजेरी लावून आनंद लुटला. या वेळी ना खासदारांनी मास्क लावला हाेता ना त्यांच्या समर्थकांनी. जमावबंदी, संचारबंदी, कार्यक्रमबंदी अशा प्रशासनाच्या काेणत्याही निर्बंधांची तमा न बाळगता गाण्यावर थिरकणाऱ्या खासदारांवर अक्षरश: नाेटांची उधळणही करण्यात आली .

कव्वाली, नाचगाणे सुरू असताना अनेकांनी या कार्यक्रमाचे व्हिडिआे, फेसबुक लाइव्ह देखील केले. रात्री बाराच्या सुमारास दौलताबाद पोलिसांना माहिती मिळाली. त्यांनी फार्महाऊस मालक व आयाेजकांसह ५० जणांवर गुन्हे दाखल केले. दरम्यान, नियमानुसार पाहूण्यांवर गुन्हा दाखल करता येत नसल्याने खासदारांवर गुन्हा दाखल केला नसल्याचे पाेलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी सांगितले. त्यामुळे नियम माेडूनही खासदार मात्र नामानिराळे राहिले.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: July 5, 2021, 1:23 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *