फिलिपीन्समध्ये मोठी दुर्घटना; 85 जण प्रवास करणारे लष्करी विमान कोसळलं, 17 जणांचा मृत्यू, आतापर्यंत 40 जणाना वाचविण्यात यश
फिलिपीन्स : फिलिपिन्समध्ये (Southern Philippines) सैन्याच्या एका विमानाचा (military plane) मोठा अपघात झाल्याचे वृत्त समोर येत आहे. अपघात झाला त्यावेळी विमानात 85 जण होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळावर बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. ही घटना रविवारी लष्करी विमान लँडिंगच्या वेळी घडली. लष्कराच्या सी-130 या विमानाने कागायन डी ओरो शहरातून उड्डाण घेतली होती. दरम्यान, या घटनेमध्ये 17 लोकांचा मृत्यू असून यातून 40 जणांना वाचवण्यात यश आले आहे. वाचवण्यात आलेल्या त्या लष्करांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे आर्मी चीफ जनरल सिरिलीटो सोबेजाना यांनी AFP शी बोलताना सांगितले.
Philippines military plane crashes with 85 people aboard, reports sayhttps://t.co/cMWLrlMQ3w pic.twitter.com/Ev0khLz7MN
— Sputnik (@SputnikInt) July 4, 2021
ते पुढे म्हणाले की, अपघातादरम्यान या विमानाला सुलू राज्यातील जोलो आयलँडवर लँडिंग करण्यासाठी प्रयत्न सुरु होते.सोबेजाना म्हणाले की, आम्हाला घटनेची माहिती मिळताच मदत व बचाव दलाला घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे. ABS-CBN न्यूजच्या बातमीनुसार, विमानातून धूर येत होता आणि इंजिनच्या भागाला आग लागली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून फिलीपीनमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. हवामानामुळे वैमानिकाला विमान लँड करण्यास अडथळा आला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 4, 2021, 1:29 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY