डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुधारित आराखडा मान्यतेबाबत त्वरीत कार्यवाही करावी – धनंजय मुंडे
मुंबई, दि. 30 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक माणगाव तालुक्यातील गोरेगांव येथे उभारण्याबाबत सुधारित आराखडा समाज कल्याण आयुक्तालयाच्या मान्यतेसाठी सादर करावा व स्मारक उभारणीबाबत कार्यवाही त्वरीत करण्यात यावी, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
रायगड जिल्ह्यातील गोरेगांव विभाग (ता. माणगांव) येथील पंचशील बौद्धजन सेवा संघ, स्वयंसेवी संस्थेमार्फत स्मारक उभारणे व विविध लोकोपयोगी उपक्रमाबाबत आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकी दरम्यान श्री.मुंडे बोलत होते. यावेळी पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु. आदिती तटकरे व खासदार सुनिल तटकरे उपस्थित होते.
श्रीवर्धन राज्यमार्गाला लागून असलेल्या मौजे गोरेगाव येथे पंचशिल बौद्धजन सेवासंघाच्या जागेवर 1985 मध्ये संस्थेची इमारत उभारण्यात आली होती. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सभा घेतली होती. अशा या ऐतिहासीक स्थळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारुन बहुद्देशीय इमारत बांधण्याचा संस्थेचा संकल्प आहे. या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम संस्थेमार्फत पूर्ण झाले असून उर्वरित इमारत बांधकामाकरीता अनुदान मिळण्याबाबत संस्थेच्या वतीने विनंती करण्यात आली आहे.
यावेळी राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. तटकरे म्हणाल्या, या बहुद्देशीय स्मारक व इमारतीसाठी नव्या आराखड्यानुसार निधी देण्यात येणार आहे. या बहुद्देशीय प्रकल्पातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रबोधनाचे कार्य घडेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, सहसचिव दि. रा. डिंगळे, अवर सचिव अ.कों. अहिरे, पंचशील बौद्धजन सेवा संघाचे अध्यक्ष विकास गायकवाड, संघाचे सचिव संदिप साळवी, श्री. बापू सोनगिरे व संबधित अधिकारी उपस्थित होते.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 30, 2021, 6:55 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY