ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी संदीप माळवी यांची नियुक्ती
ठाणे: ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी संदीप माळवी यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने आज नियुक्तीचे आदेश निर्गमित केले आहेत. महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले.
अतिरिक्त आयुक्त(1) संदीप माळवी यांचे शिक्षण कोल्हापूर या त्यांच्या मूळ गावी झाले असून त्यांनी एमबीए, एलएलबी, बीजेसी, नागरी व्यवस्थापनामध्ये पदविका आणि बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केले आहे.
अतिरिक्त आयुक्त(1) संदीप माळवी यांनी 12 वर्षे पत्रकारिता मध्ये काम केले आहे. श्री. माळवी यांनी २००२ साली शासकीय सेवेला सुरूवात केली. राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण संस्थेत सह संचालक माहिती शिक्षण व संपर्क म्हणून काम केले. सन 2005 साली ते ठाणे महापालिका मध्ये मुख्य माहिती व जनसंपर्क अधिकारी म्हणून रूजू झाले. गेली 6 वर्षे ते उप आयुक्त पदावर कार्यरत असून आज राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने त्यांची ठाणे महापालिलेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नतीने नियुक्ती केली आहे.
एक उत्तम प्रशासकीय अधिकारी यासोबत ते उत्तम कवी, गझलकार, गीतकार, लेखक म्हणून परिचित आहेत. संदीप माळवी यांना त्याच्या प्रशासकीय सेवेत तील उल्लेखनीय कार्याबद्दल तसेच त्याच्या लेखनाचा अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 30, 2021, 6:51 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY