Breaking News

धोका आहे!, चौकशीला हजर राहू शकत नाही; अनिल देशमुखांचे ईडीला पत्र

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: June 29, 2021 5:25 pm
|

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर देशमुख यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. आतापर्यंत दोन वेळा ईडीनं देशमुख यांच्या घरी छापे टाकून कागदपत्रांची तपासणी केली आहे. सक्तवसुली संचानलाय (Enforcement Directorate) हे सध्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची चौकशी करत आहे. ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी आज (मंगळवार, 29 जुन) बोलावले होते.

मात्र माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सक्तवसुली संचानलायाच्या (ईडी) अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास असमर्थता दर्शवली आहे. वय, आजारपण आणि करोनाच्या धोक्याचं कारण देशमुख यांनी त्यासाठी दिलं आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माझी चौकशी करावी, असं देशमुख यांनी म्हटलं आहे.दरम्यान, आपले वय, आजारपण आणि बाहेर असलेला कोरोनाचा धोका यामुळे आपण चौकशीसाठी येऊ शकत नाही. त्यामुळे आपण व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे आपली चौकशी करावी, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. ऑनलाईन अथवा ऑडिओ किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे जबाब नोंदविण्यास मी केव्हाही तयार आहे. तसेच, ईडीच्या प्रश्नांना उत्तरे देणयासाठी मी अधिकृत प्रतिनिधी नेमला असल्याचेही अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

दरम्यान , सीबीआय, ईडी यांसारख्या तपास यंत्रणांनी अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई येथील निवासस्थानी छापेमारी केली. त्यानंतर देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना अटकही करण्यात आली. आता त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. अनिल देशमुख यांना ईडीकडून आतापर्यंत दोन वेळा समन्स बजावण्यात आले आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: June 29, 2021, 5:25 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *