Breaking News

Ganpati Festival 2021 | यंदाही साधेपणानेच साजरा करावा लागणार गणेशोत्सव, गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: June 29, 2021 5:08 pm
|

मुंबई :गणोशोत्सव साधेपणानेच:यावर्षीही साधेपणानेच साजरा करावा लागणार गणेशोत्सव, राज्य सरकारने नियमावली केली जाहीर
महाराष्ट्र आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमणाची आतुरतेने वाट पाहत आहे. लवकरच घराघरात गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यावेळीही देखील गणपती उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे सरकारकडून गणेशोत्सवासंदर्भात काय निर्णय घेणार याविषयी सर्वाच वाट पाहत होते. अखेर ठाकरे सरकारकडून यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर केल्या आहेत.

काय आहे नियमावली?

सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांना पालिका किंवा स्थानिक प्रशासनाच्या धोरणारणानुसार पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असेल.

महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाने मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.

घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यामध्ये भपकेबाजी नसावी.

गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूटांची आणि घरगुती गणपतीकरीता 2 फूटांची असावी.

यंदा पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू, संगमरवरी मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती जर का शाडूची असेल तर त्याचे विसर्जन शक्यतो घरी करावे. ते शक्य श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

गणपतीच्या मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रिनींगची व्यवस्था असावी. मंडपात दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क, सॅनिटायझर पाळण्याकडे लक्ष देण्यात यावे.

नसल्यास कृत्रीम विसर्जन स्थळी करावे.

जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी होणार नाही याकडे लक्ष द्यावे.

सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक कार्यक्रम/शिबिरे (उदा.रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे.

राज्य सरकारकडून वेळोवेळी लागू करण्यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain चे नियम कायम राहतील.

गणेशोत्सवादरम्यान यामध्ये कोणतीही शिथिलता दिली जाणार नाही.

आरती भजन, किर्तनाच्या कार्यक्रमात गर्दी होणार याची दक्षता घ्यावी. तसेच तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियम आणि तरतूदींचे काटेकोर पालन करण्यात यावे.

श्रींचे आगमन किंवा विसर्जन मिरवणूक काढू नयेत. विसर्जनावेळी पारंपरिक पद्धतीने होणारी आरती घरी करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ व्यतीत करावा.

चाळीतील आणि इमारतीतील गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्र काढू नये.

महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमूर्तीच्या विसर्जनाकरता कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: June 29, 2021, 5:08 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *