ठाण्यात आज विक्रमी २२,०४२ लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण
ठाणे: ठाणे महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत आज महापालिका लसीकरण केंद्र व खाजसी हॉस्पिटल यांच्यावतीने विक्रमी तब्बल २२,०४२ लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण केले असून तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत दिलासादायक बाब असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली.
ठाणे महापालिककेच्यावतीने शहरात ५३ लसीकरण केंद्राच्यावतीने व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू आहे. सर्व लसीकरण केंद्रावर ‘वॉक इन’ तसेच ऑनलाईन नोंदणी करून लस देण्यात येत असून मोबाईल लसीकरण सेंटर्स तसेच “ड्राईव्ह इन”च्या माध्यमातून देखील लसीकरण करण्यात येत आहे. यासोबत टास्क फोर्सच्यावतीने शहरातील खासगी हॉस्पिटलना देखील लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे.
आज महापालिका लसीकरण केंद्र व खासगी हॉस्पिटल यांच्यावतीने तब्बल २२,०४२ लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. लसीकरण मोहिमेंतर्गत महापालिकेने आजपर्यंत ५,५५,५३७ लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण केले असून ठाणे शहरासाठी ही दिलासादायक बाब आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 29, 2021, 2:48 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY