नेमबाजी वर्ल्डकप : महाराष्ट्राची ‘सुवर्णकन्या’ राही सरनोबतने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास!
नवी दिल्ली : क्रोएशियामध्ये (Croatia) सुरू असलेल्या ISSF नेमबाजी वर्ल्ड कप (Shooting World Cup) स्पर्धेत भारतीय नेमबाज राही सरनोबतने (Rahi Sarnobat) 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. नेमबाजी विश्वचषकातील भारतासाठी हे पहिले सुवर्णपदक ठरले. अंतिम फेरीत राहीने 40 पैकी 39 गुण मिळवत सुवर्णपदक मिळविले तर मनू भाकरला (Manu Bhaker) अंतिम सामन्यात काही खास करता आले नाही आणि तिला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर फ्रान्सच्या माथिल्डे लामोले हिनं ३१ गुणांसह रौप्य पदकाची कमाई केली. तर रशियाची विन्टालिना २८ गुणांसह कांस्य पदकाची मानकरी ठरली आहे.
सुरुवातीपासूनच आघाडी घेत राहीनं अचूक लक्ष्यवेध घेत सुवर्णपदकाची कामे केली आहे. या वर्ल्डकपमध्ये १० मीटर एअर पिस्तूल मिश्र स्पर्धेत सौरभ चौधरी आणि मनु भाकेर या भारतीय जोडीने रौप्यपदक जिंकले. तर, सरनोबतने मिळविलेले सुवर्णपदक हे वर्ल्डकपमधील भारताचे पहिले सुवर्णपदक आहे. राहीच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे-
Indian shooter Rahi Sarnobat wins gold medal in the women's 25M Pistol event at the ISSF World Cup in Osijek, Croatia.
(Pic courtesy: SAIMedia Twitter) pic.twitter.com/NArVffhyf5
— ANI (@ANI) June 28, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 28, 2021, 7:11 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY