Breaking News

…अन् सुप्रिया सुळेंच्या समोरच दिल्या ‘अजित पवार मुर्दाबाद’ च्या घोषणा

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: June 28, 2021 3:04 pm
|

पुणे : पुण्यातील आंबिल ओढा परिसरात दि. २४ जून रोजी सकाळी अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरु करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले होते. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला होता. तसेच यावेळी आंदोलन करत स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. तर, शेकडो कुटुंब ऐन पावसाळ्यात उघड्यावर पडली आहेत.

यावेळी आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार यांना आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. सुप्रिया सुळे यांच्यासमोरच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार मुर्दाबाद… महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद… अशा घोषणा दिल्या.यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आंदोलकांची भेट घेतली. या कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळे यांनी संयम राखण्याचं व राजकारण न करण्याचं आवाहन केलं. ‘मी इथं राजकारण करण्यासाठी आलेले नाही. हा प्रश्न संवेदनशीलपणे सोडवणं गरजेचं आहे,’ असं त्या म्हणाल्या. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं पाडलेली स्थानिकांची घरं बांधून देण्यात यावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, स्थानिकांच्या आक्रोशानंतर आणि पोलीस-स्थानिक यांच्या संघर्षानंतर न्यायालयाने या तोडकामास पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. तर, ऐन पावसाळ्यात घाईने करण्यात आलेल्या या कारवाईवर सर्वच पक्षीय नेत्यांनी नाराजी वर्तवली असतानाच ही कारवाई नेमकी कोणाच्या सांगण्यावरून झाली याबाबत अनेक चर्चा शहरात सुरु आहेत. पुण्यातील आंबिल ओढा प्रकरणातील विकासक उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा निकटवर्तीय असल्याची कुजबुज आहे. घरं पाडण्यात आलेल्या स्थानिकांनी पुणे महानगरपालिकेच्या समोर ठिय्या मांडत आंदोलन सुरू केलं आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: June 28, 2021, 3:04 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *