देवेंद्रजींना संन्यास घेऊ देणार नाही, त्यांची महाराष्ट्र, देशाला गरज, मी त्यांची भेट घेईन; संजय राऊत
मुंबई: राज्यात सध्या ओबीसी आरक्षण पुन्हा लागू करण्यात यावं, यावरुन राजकीय वातावरण तापले आहे.या मुद्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी शनिवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका तीन ते चार महिन्यात आपण ओबीसी आरक्षण परत आणू शकतो.सूत्र आमच्या हाती द्या आणि हे ओबीसी आरक्षण परत नाही आणू शकलो, तर राजकीय संन्यास घेईन! अशी भूमिका घेतली होती. . ते ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यासाठी भाजपने पुकारलेल्या जेलभरो आंदोलनात बोलत होते. फडणवीसांच्या या विधानावरुन राजकीय वर्तुळात टीका टिप्पणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर उपरोधात्मक टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय भविष्य उज्ज्वल असून ते लढवय्ये नेते आहेत त्यामुळे अशा नेत्यांची देशाला नितांत गरज आहे. फडणवीस यांनी राजकीय संन्यास घेतल्यास भाजपसह जनतेचे मोठे नुकसान होईल. त्यामुळेफडणवीसांनी असा त्रागा करून घेऊ नये. सर्वकाही सुरळीत व त्यांच्या मनाप्रमाणे होईल. संन्यास घेण्याची भाषा शोभत नाही. ते जर संन्यास घेत असतील मी त्यांना भेटून मन वळवण्याचा प्रयत्न करणार असल्याची खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 28, 2021, 2:43 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY