तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून कडक निर्बंध’; सायंकाळी ५ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी
मुंबई :राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत (Corona) वाढ होत आहे. काही आठवड्यांपूर्वी कोरोना रुग्णसंख्येत घट झाली होती. त्यामुळे राज्य सरकारने पाच टप्प्यात अनलॉक केलं होतं. पण राज्यातील काही जिल्ह्यांत ‘डेल्टा प्लस’ कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी राज्यात डेल्टा पल्समुळे पहिला बळी गेला. या दरम्यान नागरिकांनी कोरोना नियम पायदळी तुडवले.परिणामी या विषाणूचा संक्रमण दर अधिक असल्याने तसेच तिसऱ्या लाटेत ५० लाख रुग्ण आढळण्याचा आरोग्य विभागाचा अंदाज असल्याने राज्य सरकारकडून खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारपासून (ता. २८) राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सर्व दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत खुली राहणार असून सायंकाळी ५ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यासाठी सरकारने यासंदर्भात गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
तिसर्या टप्प्यात काय सुरु राहणार?
– अत्यावश्यक सेवेतील दुकानं सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहणार
– इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 पर्यंत सुरू राहणार
– मॉल्स, थिएटर बंदच राहतील
– रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेनं सकाळी 7 ते 2 सुरू राहतील
– दुपारी 2 नंतर होम डिलिव्हरी सेवा सुरू राहिल
– लोकल सेवा बंदच राहिल
– सार्वजनिक मैदानं, बागा, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंगला सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत परवानगी
– खाजगी, शासकीय कार्यालयं 50 टक्के उपस्थितीत सुरू राहणार
– चित्रपट, मालिकांच्या चित्रिकरणास स्टुडिओत परावनगी
– लग्न सोहळ्याला 50 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी
– अत्यंसंस्कारासाठी 20 लोकांना उपस्थित राहता येणार
टास्क फोर्सच्या प्रशासनाला सूचना : ७० टक्के लसीकरण करण्यावर भर द्या
1. पात्र नागरिकांपैकी ७० टक्के लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा.
2. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या पद्धतीचा अवलंब करा.
3. हवेमधून पसरू शकणाऱ्या कोरोनाच्या प्रकारांना टाळण्यासाठी कार्यालयांच्या ठिकाणी हवेशीर वातावरण ठेवा.
4. मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचण्या करा.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 28, 2021, 2:13 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY