‘संजय राऊत खातो शिवसेनेचं आणि जागतो पवारांना’; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
पुणे : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे.ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवा अशा मागणी साठी भाजपाने काल राज्यभर महाविकास आघाडी सरकारविरोधात चक्काजाम आंदोलन केले होते. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘राज्यातील ओबीसींचं आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं. मात्र तरीही महाविकास आघाडी सरकार मोदी सरकारवर खापरं फोडतं. माझ्या हाती सूत्रं दिल्यास ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण मिळवून देईन आणि आरक्षण न मिळाल्यास राजकारणातून संन्यास घेईन,’ अशा आक्रमक पवित्रा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता.
दरम्यान भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरक्षणाच्या विषयावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या वादात आता भाजपचे गोपीचंद पडळकरांनी उडी घेत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांवर विखारी शब्दात टीका केली आहे. यासोबतच त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वादाल संजय राऊतच जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही केला आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड करत पडळकरांनी ही टीका केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत बिनबुडाचा लोटा आहेत. संजय राऊत शिवसेनेचं खातात, मात्र पवारांसाठी जागतात. त्यामुळे अशा संजय राऊतांची धनगर समाजाला आवश्यकता नाही. असे म्हणत गंभीर शब्दात पडळकरांनी राऊतांवर टीका केली.
पुढे बोलताना पडळकर म्हणाले की, ओबीसी समाजासाठी फडणवीस यांनी 23 जीआर काढले. हे देखील संजय राऊत यांना माहिती नाही. एकाही आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्या बाबत आपले आधी तोंड उघडा. त्यामुळे मी त्यांचा निषेध करत असल्याचेही पडळकर म्हणाले. पुढे बोलताना म्हणाले की, ‘मुळात जे आदिवासींना तेच धनगरांना. जोपर्यत प्रमाणपत्र येत नाही तोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी धनगरांसाठीच्या योजनेतील 100 कोटी दिले होते. हे पैसे संजय राऊत यांच्या मालकाने अडवून ठेवले आणि ते आता देत नाही. याविषयी त्यांनी बोलायला पाहिजे’ असे मतही गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केले आहे.
पडळकरांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील विकोपाला संजय राऊतांना जबाबदार धरत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, ‘दोन भावामध्ये भांडण लावण्याचे काम या संजय राऊतांनी केले आहे. तसेच त्यांनीच राजीनामा घेतला. काकांच्या सांगण्यावरून अग्रलेखात अविनाश भोसले हे अजित पवारांच्या किती जवळचे आहेत याविषयी ते सांगत आहे. असे म्हणत पुतण्याच्या मागे फटाके लावायचे काम करत राऊत करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 27, 2021, 6:59 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY