Breaking News

कॅनडातील जोडप्याचं डोंबिवलीत ऑलनाईन शुभमंगल सावधान!..

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: June 27, 2021 6:10 pm
|

डोंबिवली : डोंबिवली मध्ये एक विवाह सोहळा अनोख्या पद्धतीने पार पडला कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमधील बंधनामुळे अनेकांचे विवाह सोहळे रखडलेत .डोंबिवलीतील एका कुटुंबाने विवाह सोहळा पद्धतीचा नवीन आदर्श घालून दिला आहे.या लग्नात वधू वर चक्क सात समुद्रा पार कॅनडाला होते. मात्र वराच्या वडिलांनी पुढाकार घेत डोंबिवलीहून भटजीच्या मदतीने व मोजक्या नातेवाईकांच्या ऑनलाइन पद्धतीने आपल्या एकुलत्या एक मुलाचा विवाह सोहळा लावून दिला.

लग्न होतं डोंबिवली पुर्वेकडील भोपर गाव परिसरात राहणाऱ्या डॉ इरामन चौधरी यांच्या मुलाचं .लहानाचा मोठा डोंबिवली मध्ये झालेल्या भूषणने सात वर्षा पूर्वी उच्चशिक्षणासाठी कॅनडा येथे जाण्याचा निर्णय घेतला .सात वर्षा पूर्वी भूषण कॅनडाला गेला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला तेथेच नोकरी लागली व नोकरीमुळे तो कॅनडात स्थायिक झाला. याच दरम्यान त्याचे मनजीत कौर या तरुणीशी प्रेमसंबंध जुळले. दोघांनीही आपल्या कुटुंबाला विवाहाबद्दल इच्छा बोलून दाखवली. चौधरी व कौर कुटुंबाने देखील या दोघांना विवाहाची परवानगी दिली मात्र 2020 पासून कोरोनामुळे त्यांना भारतात येता येत नव्हते तर त्यांच्या कुटुंबियांना कॅनडा जाता येत नव्हते .फोनवर लग्नाबद्दल बोलणी व्हायची मात्र कोरोना ,त्यामुळे लागलेला लोकडाऊन व लोकडाऊन मधील बंधने यामुळे दोन वर्षांपासून तारीख निश्चित होत नव्हती .अखेर या दोन्ही कुटुंबांनी आपल्या मुलांचा ऑनलाइन विवाह करण्याचं ठरवलं .त्यानुसार चौधरी व कौर कुटुंबाने तयारी सुरू केली . लग्नासाठी लागणारे सर्व सामान कुरियरच्या माध्यमातून भूषणला कॅनडा येथे घरपोच करण्यात आले त्यानंतर आज ठरलेल्या मुहूर्तावर चौधरी कुटुंबाच्या डोंबिवली येथील घरी भटजी आले.विवाह ऑनलाइन होणार असल्याने नातेवाईकाची गर्दी नव्हती.भटजीनी कॅनडा येथे असलेल्या भुशन व हरदीप याना ऑनलाइन लाईव्ह व्हिडियोच्या माध्यमातून लग्नाचे विधी सांगत त्या प्रमाणे ते करवून घेतले व अखेर कॅनडा येथे राहत असलेल्या भूषण व हरदीप चा डोंबिवली येथून ऑनलाईन विवाह संपन्न झाला . यावेळी या विवाह सोहळ्याला ऑनलाईन हजेरी लावलेल्या नातेवाइकांनी व चौधरी कुटुंबाच्या मित्रपरिवाराने नववधू,वराला ऑनलाइनच आशीर्वाद दिले ,अक्षदा देखील ऑनलाईनच टाकले .या लग्नानंतर वराचे वडील डॉ इरामन चौधरी यांनी या विवाह सोहळ्याबद्दल आंनद व्यक्त केला पण कोरोना काळात अशाच पद्धतीने विवाह सोहळा करण्याचे आवाहन केलं .भटजी ठोंबरे यांनी पहिल्यांदाच अशाप्रकारे विवाहसोहळा लावून दिलं मात्र ही पद्धत चांगली असून करण्यासारख्या काळामध्ये याचे अनुकरण करावे असे आव्हान यावरच यांनी देखील केले..


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: June 27, 2021, 6:10 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *