Breaking News

केंद्र शासनाच्या विरोधासह ओबीसी आरक्षणासाठी कॉग्रेसचे ठाण्यात धरणे आंदोलन

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: June 26, 2021 7:49 pm
|

ठाणे : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण रद्द करण्याच्या मुद्द्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सर्वोच्च न्यायालयात केंद्र शासनाचे चुकेचे प्रतिज्ञापत्र सादर केल्यामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले आहे असा आरोप करत ते परत मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे . या धरणो आंदोलनातील काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान करून ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे,ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे- नाही कोणाच्या बाप्पाचे, ओबीसींचे आरक्षण परत करा, नाही चालणार,नाही चालणार अशा केंद्र शासनाच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी केली. केंद्र शासन म्हणजे चोराच्या उलटय़ा बोंबा,असे असून राज्यघटना संपुष्ठात आणण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप ठाणे शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी येथील काँग्रेस आंदोलन प्रसंगी मार्गदर्शन करते वेळी केला.
        
 शासकीय विश्रामगृहा समोर काँग्रेसने शनिवारी धरणे आंदोलन करून केंद्रातील भाजपा सरकारच्या कारभाराचा निषेध केला.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार छत्रपती शाहू महाराज, यांच्या जयंती निमित्ताने व सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून ठाणे शहर काँग्रेस कमिटीने शनिवारी हे धरणे आंदोलन करून केंद्रातील मोदी सरकारचा निषेध केला.मोदी सरकारची सात वर्षीय जुलमी कारकीर्द,एक तर्फी घेतलेले अन्यायकारक निर्णय म्हणजे एक प्रकारची अघोषित आणीबाणीच असल्याचा आरोप यावेळी शहराध्यक्ष अँड.विक्रांत चव्हाण,यांच्यासह प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांनी केला आहे.ठाणे जिल्हा इंटक काॅग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे,प्रदेश सदस्य सुखदेव घोलप,जे.बी.यादव,भालचंद्र महाडिक आदि नेते उपस्थित होते.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: June 26, 2021, 7:49 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *