काँग्रेसच ओबीसी आरक्षणाची मारेकरी: देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
नागपूर: राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निर्णयाविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. राज्याभरात भाजपचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. नागपुरात सत्ताधाऱ्यावर हल्लाबोल करताना फडणवीस म्हणाले, ओबीसी आरक्षणाचे मारेकरी काँग्रेसशी संबंधित आहेत.त्यांनी या आरक्षणाबद्दल पुनर्विचार याचिका दाखल केली होती.आम्ही ओबीसी आरक्षणासाठी रात्री अध्यादेश काढला. मग तो लगेच राज्यपालांकडे पाठवला. पण महाविकास आघाडी सरकारनं १५ महिने न्यायालयात शपथपत्रच सादर केले नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातलं ओबीसींचं राजकीय आरक्षण गेले . फडणवीस नागपूर येथील आंदोलनात बोलत होते. ते म्हणालेत – सरकारला ओबीसींचे आरक्षण पुन्हा द्यावेच लागेल, नाही तर खुर्ची खाली करावी लागेल.
आम्ही ५० टक्यांच्या वरील आरक्षण न्यायालयात वाचवून दाखवलं. त्यासाठी राम शिंदे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या मंत्र्यांनी अतिशय उत्तम काम केलं. पण महाविकास आघाडी सरकारने वेळकाढूपणा करत आरक्षणाचा मुडदा पाडला, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण मिळवून देईन आणि आरक्षण न मिळाल्यास राजकारणातून संन्यास घेईन, असेही त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारमध्ये ओबीसी नेत्यांची कुचंबणा होत आहे. मात्र राजकीय भवितव्याची चिंता असल्याने त्यांना याविरोधात बोलताही येत नाही. सरकारमधील मंत्र्यांनी मोर्चे काढण्याऐवजी न्यायालयात बाजू नीट मांडली असती तर आरक्षण गेले नसते. आज संपूर्ण देशात ओबीसींचे आरक्षण कायम आहे. काँग्रेसशासित छत्तीसगड, राजस्थानातही आरक्षण कायम असताना महाराष्ट्रात मात्र ओबीसींना आरक्षण नाही. याला सर्वस्वी महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 26, 2021, 6:28 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY