Pune Lockdown: पुण्यात निर्बंध आणखी कडक; दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी, वाचा , काय सुरू? काय बंद?
पुणे : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु डेल्टा प्लस व्हेरिएंटने आता डोके वर काढले आहे. या विषाणूचे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण आढळून आले आहेत. यापार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा निर्बंध लागू केले आहे. हे निर्बंध येत्या 28 जून 2021 पासून लागू करण्यात येणार असल्याचे पुणे महापालिकेने स्पष्ट केले आहे. तर निर्बंध कठोर केल्यानंतर काही गोष्टी सुरु किंवा बंद ठेवण्यात येतील असे ही सांगण्यात आले आहे..पुणे आयुक्तांनी कोरोना19 ची साखळी तोडण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार कोणत्या गोष्टी सुरु राहणार किंवा बंद राहणार याबद्दल एक परिपत्र काढले आहे.
तर जाणून घ्या पुण्यातील असे असतील निर्बंध:
-अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस चार वाजेपर्यंत सुरू राहणार
-अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने शनिवार, रविवारी पूर्ण बंद राहणार. इतर दिवशी चार वाजेपर्यंत सुरू राहणार.
-सार्वजनिक बस सेवा ५० टक्के क्षमतेनं सुरू राहणार. उभ्यानं प्रवासास परवानगी नाही.
-मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृहे पूर्ण बंद राहणार
-रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत बसण्यास सुरु असतील. पण तेव्हा 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील. शनिवार आणि रविवारी पूर्णपणे बंद राहतील.
-लोकल ट्रेनमधून फक्त वैद्यकिय सेवेसाठी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व महिलांसाठी, शासकीय कर्मचारी, विमानतळ सेवा, बंदरे सेवा यांच्या कर्मचाऱ्यांना प्रवास करता येणार आहे.
-पुणे महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, चालणे किंवा सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरु राहतील.
-सूट देण्यात येत असलेल्या आस्थापन/सेवा व्यतिरिक्त सर्व खासगी कार्यालये कामाच्या दिवशी 50 टक्के कर्मचाऱ्यांसह दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील.
-पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा आणि कोविड19 व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरु राहतील.
दरम्यान, कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेत राज्यात 50 लाख रुग्णांना संसर्ग होण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे. त्यापैकी 8 लाख लोकांना हॉस्पिटलची गरज भासणार आहे. त्याचबरोबर एकूण संसर्ग झालेल्यांपैकी 10 टक्के म्हणजेच 5 लाख रुग्ण लहान मुलं असणार असल्याचेही ते म्हणाले.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 26, 2021, 6:14 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY