Breaking News

BREAKING: अनिल देशमुखांना ईडीचं समन्स, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश, शुक्रवारच्या झडतीनंतर स्वीय्य सहाय्यक, सचिवाला झाली अटक

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: June 26, 2021 1:11 pm
|

मुंबई : 100 कोटी वसूलीच्या आरोपावरुन माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ईडीच्या धाडसत्रानंतर आता आनिल देशमुख यांना आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. . यापूर्वी ईडीने शुक्रवारी देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरमधील 6 ठिकाणी छापेमारी केली होती. पोलीस अधिकाºयांना १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोपांप्रकरणी अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी सुरू आहे.आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुंबईतील १० बार मालकांचे जबाब ईडीनं नोंदवले आहेत.

दरम्यान, ईडीने रात्री उशिरा त्यांचे खाजगी सचिव संजीव पलांडे आणि वैयक्तिक सहाय्यक कुंदन शिंदे यांना अटक केली होती. त्या दोघांना मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (PMLA) अटक करण्यात असून त्यांना आज सकाळी 11 वाजता कोर्टात हजर केले जाणार आहे. ईडीने शनिवारी देशमुख यांचे निकटवर्तीय सागर नावाच्या व्यक्तीच्या नागपूरमधील एका ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. सागर हा अनिल देखमुख यांच्या तीन डझनहून अधिक कंपन्यांमध्येही संचालक होता. सागर नावाच्या या व्यक्तीचा कोलकातामध्ये कोट्यवधींचा व्यवसाय असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान,मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिरसिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी दरमहिन्याला 100 कोटी रुपये हप्ता जमा करायला सांगितले होते, असा गंभीर आरोप त्यात होता. परिणामी देशमुखांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयने एप्रिलमध्ये दिल्लीत गुन्हा दाखल केला होता. याच आधारे ईडीने मे महिन्यात पैशाच्या अफारातफर प्रकरणी गुन्हा दाखल केला. शेल कंपन्या किंवा हवालामार्फत पैसा गुंतवला आहे का, याचा तपास ईडी करत आहे.

तसेच, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईतील १० बार मालकांनी सलग तीन महिने अनिल देशमुख यांना ४ कोटी रुपये दिले होते, अशी धक्कादायक माहिती सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) तपासात उघड झाली आहे. याच संदर्भात अनिल देशमुखांच्या निवासस्थानांवर ईडीने छापा टाकल्याचे समोर आले आहे.यात अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानांचाही समावेश आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: June 26, 2021, 1:11 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *