ओबीसी आरक्षण :भाजपचं महाराष्ट्र भर ‘चक्का जाम’आंदोलन सुरू

मुंबई : मराठा आरक्षणा पाठोपाठ आता ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) भाजपाकडून आज (२६ जून) रोजी ‘राज्यव्यापी चक्का जाम आंदोलना’त करण्यात येत आहे. ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्रात चक्काजाम (Chakkajam Aandolan) आणि जेलभरो आंदोलन (jail Bharo Aandolan) सुरू करण्यात आले आहे. भाजपा कडून ठिकाणी कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलनं करत आहेत. ओबीसीचे राजकीय आरक्षण टिकवण्याच्या मागणीसाठी आज राज्यभर भाजपाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले असताना काही ठिकाणी वाहतूक रोखण्याचा देखील प्रयत्न करण्यात येत आहे. यामध्ये नागपूर औरंगाबाद एक्सप्रेस हायवेची वाहतूक ठप्प झाली आहे.भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, प्रविण दरेकर तसेच पक्षाचे इतर आमदार आणि नगर सेवक उपस्थित आहेत.
नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरात यांच्या नेतृत्वाखाली वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातही आंदोलन सुरू झाले आहे तर मुंबईत मंत्रालय परिसरात मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मावळ मधील पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गा उर्से येथे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तेथेही वाहनाच्या लांबच लांब रांगा पहायला मिळाल्या आहेत. मुंबईच्या मुलूंड चेकनाका परिसराला छावणीचं स्वरूप आले आहे. शेकडो पोलीस रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात असून ठिकठिकाणी बॅरिकेटींग देखील करण्यात आले आहे.
ओबीसी आरक्षणसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत देखील आंदोलन सुरू झाले आहे. पुष्पराज चौक येथे भाजपाचा चक्का जाम सुरू झाले आहे. त्यामध्ये अठरा पगड जाती धर्माची लोक आपल्या पारंपारिक वाद्यांसह आंदोलनात सामिल झालेली पहायला मिळाली आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 26, 2021, 12:49 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY