ठाणे महापालिकेच्यावतीने नागरिकांना त्यांच्या घराजवळ कोविड-१९ लस देण्यात येणार
ठाणे : ठाणे महापालिकेच्यावतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत ४ कोविड-१९ मोबाईल लसीकरण सेंटर्स तयार करण्यात आली असून आज दिनांक २७ जून २०२१ पासून नागरिकांना त्यांच्या घराजवळ लस देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
शहरातील झोपडपट्टी तसेच चाळीमध्ये राहणारे नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नये तसेच इतर लसीकरण केंद्रावर ये-जा करणे शक्य नसणाऱ्या नागरिकांना त्यांच्या घराजवळच लस देण्याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शन सुचेनेनुसार ठाणे महापालिकेच्यावतीने ४ कोविड-१९ मोबाईल लसीकरण सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत.
या कोविड-१९ मोबाईल लसीकरण सेंटरमध्ये १ वैद्यकीय अधिकारी, १ व्हॅक्सिनेटर, २ डेटा ऑपरेटर, आणि १ निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहरातील झोपडपट्टी परिसरासोबत इतर विविध ठिकाणी दररोज दुपारी ११.०० ते ३.०० या वेळेत नागरिकांना त्यांच्या घराजवळ पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. यासाठी दररोज वेळापत्रक निश्चित करून लसीकरणाची ठिकाणे जाहीर करण्यात येणार आहे. उद्या ठाण्यातील सावरकरनगर, खारटन रोड, गांधी नगर कोपरी कॉलनी आणि साठेवाडी नौपाडा या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार असून नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 26, 2021, 12:18 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY