Breaking News

आयुक्त पदावरुन हटवल्यावर त्यांनी आरोप केले, चौकशीतून सत्य जनतेसमोर येईल’:अनिल देशमुख

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: June 25, 2021 10:22 pm
|

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून छापेमारी केली जात आहे. सकाळपासून ही छापेमारी केली जात आहे. दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे,की, ‘सीबीआय, ईडी या प्रकरणाचा तपास करत आहेत. ईडीचे अधिकारी आज चौकशी करण्यासाठी आले होते. त्यांना पूर्ण सहकार्य मी केले आहे. यापुढे देखील असेच सहकार्य केले जाईल असे देशमुख म्हणाले.

पुढे बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, माझ्यावर जे खोटे आरोप केले होते आणि ते सुद्धा परमबीर सिंग यांना पदावरुन हटवण्यात आल्यावर केले होते. पपरमबीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त होते आणि त्यांची भूमिका संशयास्पद होती त्यामुळे त्यांना पदावरुन हटवण्यात आलं. पदावरुन हटवल्यावर त्यांनी आरोप केले. त्यांना आरोप करायचे होते तर आयुक्तपदावर असताना आरोप करायला हवे होते. वाझे, काझींसह पाचही अधिकारी हे थेट परमबीर सिंग यांना रिपोर्ट करत होते.

आपल्यावर लावण्यात आलेल्या 100 कोटी वसुलीच्या आरोपांविषयी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, ‘अंबानींच्या घराबाहेर सापडलेले स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडून केला जात आहे. दरम्यान ते अधिकारी तुरुंगात आहेत. अशा संशयास्पद भूमिकेमुळेच त्यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. सीबीआयकडून नियमानुसार त्याची चौकशी केली जात आहे. त्यातून सत्य जनतेसमोर येईलच. सीबीआय, ईडीला माझ्याकडून संपूर्ण सहकार्य करेल’ असेही अनिल देशमुख म्हणाले आहेत.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: June 25, 2021, 10:22 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *