सुप्रिया सुळे पुण्याच्या महापौरांवर भडकल्या- झेपत नसेल तर राजीनामा द्या !
पुणे : आंबिल ओढ्यावरील घरांवर पुणे महापालिकेनेकेलेल्या कारवाईवरुन, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “पुण्याच्या घटनेची चौकशी व्हावी. महापौरांनी उत्तर द्यावे. आंबिल ओढ्यावरील कारवाई कुणी केली हे सर्वांना माहिती आहे. पुणे महापालिकेत सत्ता कुणाची आहे तर भाजपची. त्यामुळे महापौरांना जर झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा” असा हल्ला सुप्रिया सुळे यांनी महापौर मुरली मोहोळ यांच्यावर चढवला आहे. त्या आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
सुप्रिया सुळे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सुरु असलेल्या ED च्या छापेमारीवरुनही भाष्य केलं. “राजकारण हे विचांरांचं असतं. ते लोकांसाठी करायचं असतं. आजपर्यंत तपास यंत्रणांचा वापर आपल्या विरोधकांसाठी करतात हे यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. यंत्रणांचा गैरवापर आपण पाहात आहोत. पवरा साहेबांनाही नोटीस पाठवली होती. राजकारण विचारांचं असावे. मात्र नवी नियमावली यांनी काढली आहे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. हे जाणून बुजून केलं जातं. एखादा मोठा पक्ष देशात एव्हढी आरोग्याची भयाण परिस्थिती असतानाही सुडाचं राजकारण करत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
आमचं राजकारण हे प्रगतीचं राजकारण आहे. आम्ही लोकांची सेवा करण्यात व्यस्थ आहोत. तिसरी लाट कधी येईल याची चर्चा होईल. आता २४ तास महाविकास आघाडी तिसरी लाट रोखण्यात, त्याच्या उपाय योजनांमध्ये व्यस्थ आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
सप्टेंबर २०१९ मध्ये आंबिल ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पुर आला होता. तो प्रसंग आजही आठवतो. त्यामुळे कात्रजपासून सुरू झाले दत्तावाडीपर्यंतचा आंबील ओढ्याचा नवा मास्टर प्लॉन तयार करण्यात आला. यामध्ये अतिक्रम, पूलाचे काम आदीचे काम करण्यासाठी हा प्लॅन तयार करण्यात आला होता. त्यामध्ये महापालिकेने बांधलेला नाला सुद्धा काढण्यात आला होता. हा नाला यु आकाराचा झाल्यामुळे नागरिकांच्या घरात सातत्याने पाणी जात असल्याने कारवाईचा बगडा उगारण्यात आला. परंतू कोणत्याही नागरिकाला बेघर करण्याचा आमचा हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण पुणे महापालिकेचे महापौर मुरली मोहोळ यांनी दिले आहे. परंतू पावसाळ्याच्या तोंडावरच का कारवाईचा बडगा उरागण्यात आला असे विचारले असता महापौरांनी माहिती घेवून सांगतो म्हणत पळ काढला
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 25, 2021, 6:31 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY