अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजिव पालांडे चौकशीसाठी ईडीच्या ताब्यात
मुंबई :अंमलबजावणी संचालनालयाने (ED) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी आज सकाळी छापे टाकले. थोड्याच वेळापूर्वी अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. ईडीने चौकशीसाठी पालांडे यांना कार्यालयात नेले आहे. दुसरीकडे देशमुख यांच्या कुटुंबीयांचे फोन रेकॉर्डिंग तपासले जात असल्याची माहिती मिळत आहे. पलांडे हे कॉँग्रेसचे शिरूर तालुक्यातील माजी आमदार काका पलांडे यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काम केले आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटर बॉँब टाकला होता. यामध्ये त्यांनी अटकेत असलेला निलंबित सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे याला देशमुख यांनी मुंबईतील बारवाल्यांकडून दर महिन्याला शंभर कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितले होते. वाझेच्यागृहमंत्र्यांच्या बंगल्यातील भेटीवेळी त्यांचे खासगी सचिव संजीव पलांडे आणि अन्य एक, दोन स्टाफ असल्याचे परमबीर सिंग यांनी म्हटले होते. त्यामुळे संजीव पलांडे हे देखील ईडीच्या रडारवर आले आहेत.
संजीव पलांडे हे उपजिल्हाधिकारी म्हणून शासनाच्या सेवेत दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी पुणे, सोलापूर जिल्ह्यात विविध पदांवर काम केले. आर. आर. पाटील हे राज्याचे गृहमंत्री असताना त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले होते. त्यानंतर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक होते. पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले होते.राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी निकटचे संबंध आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन अनिल देशमुख यांची गृहमंत्रीपदी नियुक्ती झाल्यावरच लगेचच त्यांच्या स्वीय सहाय्यकपदी पलांडे यांची नेमणूक झाली.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 25, 2021, 5:15 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY