मुंबईमध्ये मोठा अपघात टळला:5 मजली इमारतीचा स्लॅब कोसळला, 40 लोकांना सुरक्षित काढण्यात यश
मुंबई : मुंबईच्या फोर्ट परिसरातील एका इमारतीचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. घटनास्थळावर अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. अपघातादरम्यान इमारतीत 40 हून अधिक लोक उपस्थित होते. सर्व लोकांना सुखरुप बाहेर काढले गेले आहे. तर अद्याप कोणत्याही जीवीतहानीची माहिती समोर आलेली नाही.
दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील पाच मजली इमारतीचा आतील स्लॅब कोसळला आहे. यात काही जण अडकल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. म्हाडाची ही इमारत 40 ते 45 वर्षे जुनी आहे आणि त्यातील आतील भागात दुरुस्तीची गरज आहे. इमारतीत दुरुस्तीचे काम सुरू असताना हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या तिसर्या आणि चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळले आहेत. पाऊस पाहता महापालिकेला अनेक इमारती दुरुस्त केल्या जात आहेत.. त्याच ठिकाणी पडझड झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातानंतर तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. इमारत का कोसळली यामागील कारणांचीही चौकशी केली जाईल.
Maharashtra: A portion of a building collapsed in the Fort area of Mumbai.
"At least 40 people have been rescued. No injuries reported so far. Rescue operation underway," say Police pic.twitter.com/9V2dF7kEs0
— ANI (@ANI) June 25, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 25, 2021, 4:24 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY