कुणी काहीही मागणी केल्याने सीबीआय चौकशी होत नसते: गृहमंत्री भडकले
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी धाड टाकली. तत्पूर्वी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत अजित पवारांच्या विरोधात सीबीआय चौकशीची मागणी करणारा ठराव मांडण्यात आला. या संपूर्ण प्रकणावर आता राज्याचे विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपली प्रतिक्रियादेऊन संताप व्यक्त केलाय .
यावेळी त्यांनी पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. त्यांनी अनेक मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने केलेल्या कारवाईवर ते म्हणाले की, , “चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. प्रत्यक्षात कोरोनाची परिस्थिती असताना सर्वांचे लक्ष त्यावर असायला हवे. तपासाबद्दल बोलायचे झाल्यास मी याबाबत जास्त बोलू इच्छित नाही. संबंधित तपास यंत्रणा आपले काम करत आहेत. पण, यात कुणी काहीही मागणी केली तरी सीबीआय चौकशी होत नसते. यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल.”
अनिल देशमुख, संजय राठोड यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर भाजपने आपला मोर्चा थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वळवला असून परमबीर प्रकरणात अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत गुरुवारी तसा ठराव करण्यात आल्यामुळे भाजपचे पुढील लक्ष्य हे अजित पवार असतील याचे संकेत मिळाले आहेत. कार्यकारिणीच्या बैठकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणप्रश्नी राज्यभर आंदोलन छेडण्याचाही निर्णय घेण्यात आला.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 25, 2021, 4:04 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY