Breaking News

…. त्याचा तपास करा,ती केस सीबीआयसाठी फिट ;संजय राऊतांची अनिल देशमुखांच्या निवासस्थानी ईडीच्या छाप्यानंतर संतप्त प्रतिक्रिया

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: June 25, 2021 2:01 pm
|

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी घरी आज सकाळी अंमलबजावणी संचालनालयाने छापा टाकला. ईडीच्या छाप्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देशमुखांवरील ईडीच्या छाप्यामुळे संताप व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘सीबीआय, ईडी काय तुमच्या पार्टीचे आहेत का? यामुळे यंत्रणांचं अवमूल्यन होतं आहे. हे सगळं सत्ताप्रेरित आहे. ”राऊत म्हणाले की, जर सीबीआय तपास करायचाच असेल तर अयोध्येच्या महापौरांनी अयोध्या मंदिर ट्रस्टसोबत जो व्यवहार केला, त्याचा तपास करा. ती केस सीबीआयसाठी फिट आहे.संजय राऊत म्हणाले की, आता आणीबाणीला विसरा. त्याचा बाऊ करू नका. इंदिरा गांधी यांनी थेट आणीबाणी लावली होती. सध्या अघोषित आणीबाणी वाटते. राष्ट्रहितसाठी कठोर व्हायला हवं, असंही ते म्हणाले.

राज्यात सीबीआय आणि ईडीचा गैरवापर होत असून भाजप या संस्थेचा राजकीय फायद्यासाठी वापर करत असल्याचा टोला राऊत यांनी लगावला आहे. भाजपच्या अशा कृत्यांमुळे देशातील दोन महत्वाच्या मोठ्या संस्थेच अवमूल्यन होत असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. प्रताप सरनाईक यांच्याबाबतीतही तेच झालं. अशा गोष्टींमुळे विनाकारण त्रास होतो. ‘विनाकारण त्रास’ हा शब्द सरनाईकांच्या पत्रातही होता. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अशी नाही. ते आज मुंबईतील प्रसार माध्यमांशी बोलत होते.

अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर जर काही आरोप असतील त्या तपासासाठी महाराष्ट्र सरकार आणि न्यायालय सक्षम असून यासाठी ईडी आणि सीबीआयची गरज नसल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.ईडी आणि सीबीआयचा वापर महाराष्ट्रात आपले सरकार येईल असे जर भाजपला वाटत असेल तर अंधारात चाचपडत आहे अशी टिका संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली. महाविकास आघाडी सरकारने दोन वर्ष पूर्ण केले असून ते अजून पाच वर्षे टिकणार असल्याचे राऊत म्हणाले.

भाजपविरोधी आघाडीची चर्चा सुरू आहे. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठका सुरू आहे. यावर राऊत म्हणाले, शरद पवारांचं महत्त्व वाढवण्याची काय गरज आहे, त्यांचा सल्ला खुद्द देशाचे पंतप्रधान, देशातील प्रमुख नेते घेतात. भाजपने विनाकारण आरोप करू नये.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: June 25, 2021, 2:01 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *