लहान मुलांसाठी कोव्हॅक्सीन लसीला ‘या’ महिन्यापासून मिळू शकते मंजुरी
मुंबई : कोरोनाची तिसरी लाट भारतात येणार असल्याचा इशारा केंद्र सरकारच्या आरोग्यमंत्र्यांकडून देण्यात आला आहे. ज्यामध्ये सगळ्यात जास्त धोका लहान मुलांना असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पालंकांसाठी ही चिंतेची बाब बनली आहे. परंतु पालकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण लहानमुलांचे लसीकरण सप्टेंबर महिन्यापासून सुरु होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.
कोरोना व्हायरसविरुद्ध लहानग्यांना सप्टेंबरमध्ये व्हॅक्सीन मिळण्याची शक्यता आहे. एका प्रसिद्ध इंग्रजी वेबसाइटच्या वृत्तानुसार, एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी ही शक्यता वर्तवली आहे. त्यांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीप्रमाणे, लहान मुलांवर कोव्हॅक्सीनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची प्रतीक्षा केली जात आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये हे व्हॅक्सीन लहानग्यांना देण्याची परवानगी मिळू शकते.
गुलेरिया यांनी सांगितले की फायजर आणि बायोएनटेक यांच्या एका व्हॅक्सीनला मंजुरी मिळाल्यानंतर कोव्हॅक्सीन लहानग्यांसाठी दुसरा पर्याय ठरू शकते. दरम्या, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याची शक्यता गुलेरिया यांनी फेटाळून लावली. या तर्काला काहीच आधार नाही असे ते म्हणाले आहेत. गुलेरिया पुढे बोलताना म्हणाले, शाळा सुरू करण्यावर देखील आता विचार करायला हवा. पण, शाळा आणि शैक्षणिक संस्था सुपर स्प्रेडर ठरणार नाहीत याचीही काळजी घ्यायला हवी. यासाठी कंटेनमेंट झोनमधील शाळांनी एक दिवसाआड सुटीचे नियोजन करावे आणि नियमांचे काटेकोर पालन करायला हवे. अनेक तज्ज्ञांनी दावा केला होता की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका आहे. अशात लहान मुलांना सुरक्षित ठेवण्याची आणि त्यांच्यासाठी व्हॅक्सीन आणण्याची तयारी सुरू झाली. एम्सच्या दिल्ली आणि पाटण्यातील रुग्णालयांत 2 ते 17 वर्षांच्या मुलांवर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनच्या चाचण्या सुरू आहेत. भारतीय औषध महानियंत्रक (DGCI) ने 12 मे रोजीच लहान मुलांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना मंजुरी दिली होती.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 23, 2021, 12:45 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY