Breaking News

CoronaVirus Updates: दिलासा! देशातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून …

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: June 23, 2021 12:32 pm
|

नवी दिल्ली : देशात बहुतांश राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने घटू लागला आहे. त्यामुळे अनलॉक केले जात आहे. देशात मंगळवारी ४२ हजार ६४० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात १ हजार ३५८ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. देशभरातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडाही आता तीन कोटींच्या पार गेला आहे. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त होत आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे. तीन महिन्यातील ही नीचांकी आकडेवारी आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल केले जात आहेत.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३ कोटी २८ हजार ७०९ वर गेला आहे. देशात ३ कोटी ८९ लाख ९४ हजार ८५५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख ९० हजार ६६० रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर ६ लाख ४३ हजार १९४ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

दुसऱ्या लाटेला कारणीभूत ठरलेला विषाणूचा डेल्टा व्हॅरियंट नष्ट झालेला नाही. त्यात बदल होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. लॅम्बडा नावाचा विषाणूचा नवा प्रकार परदेशात सापडला आहे.

प्रमुख राज्यातील परिस्थिती

1. महाराष्ट्र
मंगळवारी 8,470 संक्रमित आढळले तर 9,043 ठीक झाले. यादरम्यान, 482 मृत्यू झाले. सध्या 1.23 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

2. उत्तर प्रदेश
मंगळवारी 202 संक्रमित आढळले तर 397 ठीक झाले. 58 रुग्णांचा मृत्यूही झाला. सध्या 3,910 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

3. गुजरात
राज्यात मंगळवारी 135 संक्रमित आढळले तर 612 ठीक झाले. यादरम्यान, 3 मृत्यू झाला. सध्या 5,159 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

4. दिल्ली
दिल्लीत मंगळवारी 397 रुग्णांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली तर 467 ठीक झाले. 8 मृत्यूही झाले. सध्या 1,918 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: June 23, 2021, 12:32 pm
Tags: Tags: ,
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *