मराठा आरक्षण:राज्यसरकारकडून सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल, छत्रपती संभाजीराजेंनी ट्विट करत दिली माहिती
मुंबई : राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. ‘मराठा आरक्षण बाबत आम्ही शासनाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची प्रमुख मागणी मान्य करण्यात आली असून, आज सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली.’ असे ट्विट संभाजीराजेंनी केले. तसेच पुढे त्यांनी लिहिले की, ‘माझ्या मागणीनुसार या याचिकेमध्ये गायकवाड आयोगाच्या अहवालातील उर्वरीत अॅनेक्शर्स देखील भाषांतरीत करण्यात येतील, असे नमूद केले आहे.’
#मराठा_आरक्षण बाबत आम्ही शासनाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची प्रमुख मागणी मान्य करण्यात आली असून, आज सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 22, 2021
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर संभाजीराजेंनी आक्रमक पवित्रा घेतला होता. संभाजीराजेंनी मराठा संघटनांसोबत राज्यभरात मराठा मूक मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चात आम्ही नाही तर लोकप्रतिनिधी बोलतील असेही ते म्हणाले होते. यानंतर कोल्हापूरातील मूक मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना चर्चेसाठी बोलावले होते. या बैठकीमध्ये आंदोलकांच्या मागण्यांविषयी सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले होते. राज्य सरकारने प्रशासकीय कामे करण्यासाठी आमच्याकडे २१ दिवसांचा वेळ मागितला असून त्यासाठी आम्ही पुढील महिनाभरासाठी मूक आंदोलन स्थगित करत आहोत, अशी घोषणा खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. जर येत्या महिन्याभरात आम्हाला अपेक्षित परिणा दिसले नाहीत, तर आम्ही आमचे आंदोलन अधिक तीव्र करू, असेही खासदार संभाजीराजे यांनी काल सोमवारी सांगितले होते.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 22, 2021, 7:09 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY