खोट्या जात प्रमाणपत्र प्रकरणी खासदार नवनीत राणांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने निर्णयाला दिली स्थगिती
मुंबई : अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा यांना खोट्या जात प्रमाणपत्र प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र रद्द केले होते. मात्र या खोट्या जातप्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गेलेल्या नवनीत राणा (Navneet Rana) यांना दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. सोबतच तक्रारदारांना नोटीस बजावली आहे.
नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र हे खोटे असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळांकडून करण्यात आला होता. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडून हे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले होते. या निर्णयाविरोधात नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत रिव्ह्यू याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा अन्यायकारक आहे. दाखल केलेल्या विशेषाधिकार याचिकेअंतर्गत उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे निरीक्षण करण्याची मागणी नवनीत राणा यांनी आपल्या याचिकेमध्ये केली होती. आज सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती देताना सर्व तक्रारदारांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 जूनला होणार आहे.
दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणूकीमध्ये नवनीत राणा यांच्या विरूद्ध शिवसेनेचे आनंदराव अडसूळ उभे होते.अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवरुन नवनीत राणा खासदार म्हणून लोकसभेत पोहचल्या आहेत. पराभूत आनंदरावांनी नवनीत राणा यांच्या प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला होता. त्याची न्यायालयीन लढाई ते लढत होते अशातच काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द केल्याने त्यांची आमदारकी धोक्यात आली होती.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 22, 2021, 6:56 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY