ठाण्यात १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु , उद्या १० हजार लसीचे डोस देणार
ठाणे: राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार ठाणे महापालिकेच्यावतीने ४५ लसीकरण केंद्रावर १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण उद्या दिनांक २३ जून २०२१ पासून सुरु करण्यात येणार आहे. उद्या १० हजार लसीचे डोस देण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
ठाणे महापालिकेच्यावतीने ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे ‘वॉक इन’ आणि ऑनलाईन नोंदणी पद्धतीने दिनांक १९ जून २०२१ पासून लसीकरण सुरु करण्यात आले आहे. लसीच्या अपुऱ्या साठयामुळे १८ वर्षावरील तरुणांचे लसीकरण काही दिवस बंद कऱण्यात आले होते. परंतु राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार उद्या दिनांक २३ जून,२०२१ पासून महापालिकेच्या केंद्रावर लसीकरण सुरु करण्यात येणार आहे.
यामध्ये उद्या महापालिकेच्या एकूण ४५ लसीकरण केंद्रावर सकाळी ११.०० ते ४.०० या वेळेत १० हजार लसीचे डोस देण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
दरम्यान दर मंगळवार आणि शनिवार या दोनच दिवशी सर्वच लसीकरण केंद्रावर ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे तरी नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन देखील महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 22, 2021, 6:22 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY