बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यावर इडीची कारवाई, 40.34 कोटी रुपयांची संपत्ती केली जप्त
पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले (Builder Avinash Bhosale) यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांची जवळपास 40.34 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
ईडीचे अधिकारी गेल्या काही महिन्यांपासून अविनाश भोसलेंची चौकशी करीत होते. मनी लॉड्रींग प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही नोंद करण्यात आला होता. ईडीने अविनाश भोसलेंच्या पुणे आणि मुंबईतील मालमत्तांवर छापेही टाकले होते. त्यानंतर आता मालमत्ता जप्तीची कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचाही आरोप ठेवण्यात आला आहे.अविनाश भोसले हे बांधकाम आणि गुंतवणूक व्यवसायातील बरेच मोठे नाव आहे. याशिवाय अनेक मोठ्या मराठी उद्योजकांपैकी एक उद्योजक अशीही त्यांची ओळख आहे.अविनाश भोसले यांचे महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी जवळचे संबंध असल्याचे मानले जाते. प्रमुख नेत्यांच्या दिमतीला भोसलेंच्या मालकीची हेलिकॉप्टर नेहमी असतात. सर्वपक्षीय प्रचाराच्या वेळी ती अनेकांना दिली जातात.
Enforcement Directorate (ED) seized assets worth Rs 40.34 crores belonging to businessman Avinash Bhosle & his family members for acquiring foreign securities of company Rochdale Associates Ltd, Dubai, which was held by Bhosle family in contravention of FEMA,1999
— ANI (@ANI) June 21, 2021
दुबईतील रोशडेल कंपनीच्या सिक्युरिटीज खरेदीत विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा १९९९ (फेमा) कायद्याचे उल्लंघन केल्याचा अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप आहे. त्या अंतर्गत देखील ईडीने अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबियांची मालमत्ता जप्त केली आहे. मनी लॉड्रींग प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना त्यावेळी सोडून देण्यात आले होते. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती. यानंतर आता ईडीने भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 21, 2021, 9:51 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY