Breaking News

“OBC आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही”

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: June 21, 2021 7:25 pm
|

नागपूर : राज्यात मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही तापला आहे. काँग्रेसचे नेते व राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, आम्ही मंत्री असलो तरी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देणार नाही.

विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. भाजपने ओबीसी आरक्षणावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. परंतु भाजपच्या आंदोलनाआधीच निवडणुका न होऊ देण्याचा आम्ही इशारा दिला आहे. त्यामुळे आता भाजपचे वरातीमागून घोडे आहेत, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. तसेच ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ नये या मुद्दयावर आम्ही ठाम आहोत. मुख्यमंत्र्यांशी यावरून चर्चा झाली असून ती सकारात्मक असल्याचा दावाही त्यांनी केला.

ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी येत्या 26 आणि 27 जून रोजी लोणावळ्यात चिंतन बैठक होणार असल्याच ते म्हणाले. आम्ही इम्पिरिकल डेटाबाबत केंद्राकडे मागणी केली. केंद्राकडून हा डेटा मिळावा ही अपेक्षा आहे. तसेच डेटा गोळा करण्याचं काम आयोगाला देण्यात आलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: June 21, 2021, 7:25 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *