डॉक्टर्स देवाने पाठवलेले दूत असून ही पृथ्वीसाठी भेट : योगगुरू बाबा रामदेव
नवी दिल्ली : काही दिवसाआधी योगगुरू बाबा रामदेव यांनी अॅलिओपॅथीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने त्यांना नोटीसही बजावली. मात्र, आता अॅलिओपॅथीवर टीका करणाऱ्या रामदेव बाबांनी यू-टर्न घेतला आहे. त्यांनी लवकरच लस घेण्याची घोषणा केली आहे. यासोबतच म्हटले की, सर्व लोकांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे. रामदेव बाबा म्हणाले की, सर्व चांगले डॉक्टर्स देवाने पाठवलेले दूत आहेत.
रामदेव बाबा म्हणाले की, लोकांनी आयुर्वेद आणि योगाही स्वीकारला पाहिजे. या दोन्ही गोष्टी आजारांविरोधात कवचचे काम करतील आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूमध्येही कमतरता येईल.मी सुद्धा लवकरच लस घेणार आहे.” असे बाबा रामदेव यांनी सांगितले.
रामदेव बाबांनी पंतप्रधान मोदींच्या फ्री व्हॅक्सीनेशनच्या घोषणा आणि व्हॅक्सीनेशन ड्राइव्हच्या डीसेंट्रलायजेशनच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, 21 जून पासून देशातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण मोफत केले जाईल, पंतप्रधान मोदींनी ही ऐतिहासिक घोषणा केली आहे. आपण कोणत्याही संस्थानासोबत शत्रुत्व घेऊ शकत नाही. सर्व डॉक्टर्स देवाने पाठवलेले दूत आहेत. ही पृथ्वीसाठी भेट आहे. मात्र एखादा डॉक्टर असुनही चुकीचे काम करत असेल तर त्या व्यक्तीची चूक आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 11, 2021, 7:02 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY