Breaking News

नाशिकमधल्या अरविंद सोनार यांचा कोविशील्ड लसीमुळे शरीराकडे लोखंड, स्टील आकर्षित होतं असल्याचा दावा तज्ज्ञांनी फेटाळला

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: June 10, 2021 5:43 pm
|

नाशिक: कोरोना लसीबाबत सुरुवातीपासूनच नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा असताना, सिडकाेतील एका ज्येष्ठ नागरिकाने लस घेतल्यानंतर हाताच्या दंडावर लोखंडी व स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा दावा केला अाहे. मात्र अखेर त्यामध्ये काही तथ्य नसल्याचे समोर आले होते. त्यांचा हाताला अशा वस्तू चिकटत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. सिडकोतील शिवाजी चौकात राहणारे अरविंद जगन्नाथ सोनार (७१) यांनी कोरोनाच्या कोविशिल्ड लसीचा दोन दिवसांपूर्वी दुसरा डोस एका खासगी हॉस्पिटलमध्ये घेतला.

त्यांचा मुलगा जयंत हा बातम्या बघत असताना कोरोनाबाबत लोखंडाच्या वस्तू चिकटत असल्याचे त्याला समजल्यावर त्याने वडिलांना तुमच्या हाताला वस्तू चिकटतात का? म्हणून वस्तू लावून बघितल्या तर आश्चर्य असे की खरोखरच वडिलांच्या हाताला लोखंडाच्या व स्टीलच्या वस्तू, पैसे, चमचे चिकटत असल्याचे निदर्शनास आले. हाताला घाम आला असेल म्हणून त्यांनी अाधी हात धुतला, मात्र पुन्हा हाच प्रकार घडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही ताेच प्रकार घडला.

मी लस घेतल्यानंतर हा अजब प्रकार घडत आहे. यापूर्वी माझ्या आयुष्यात अशा कोणत्याही वस्तू माझ्या अंगाला चिकटत नव्हत्या. हा नक्की काय प्रकार आहे? याबद्दल मी डॉक्टरांचा सल्ला घेणार असल्याचे अरविंद सोनार,यांनी म्हटले आहे. तर मनपा रुग्णालय, मोरवाडी येथील डॉ. नवीन बाजी यांनीही या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. जिथे लस घेतली तिथल्या डॉक्टरांना भेटावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे यांनीही सोनार यांची भेट घेतली. याबाबत वैद्यकीय चाचणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दावा फेटाळला

राज्याच्या कोवड-19 कृतीदलाचे सदस्य तात्याराव लहाने यांनी लसीचा आणि शरीराला स्टीलचा वस्तू चिकटण्याचा संबंध नाही, अशी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “आपण अनेकांना कोविशील्ड लसीचे डोस दिले त्याचा याच्याशी कोणताही संबंध नाही. शिवाय या गोष्टीला कोणताही वैज्ञानिक आधार नसून त्यांच्या शरीराला स्टील तसंच लोखंड चिकटतंअसेल तर त्याच्या त्वचेला काहीतरी असावं, नाशिकमध्ये त्यांची तपासणी करायला हवी. परंतु लसीमुळे असं काही घडत नसून याचा आणि लसीचा संबंध लावणं योग्य नाही असे त्यांनी म्हटले आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: June 10, 2021, 5:43 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *