मुलं हवीत; कशाला? (ब्लॉग )
मुलं किंवा मुली जन्माला घालणं हा प्रत्येक स्री पुरुषांचाच नाही तर जीवसृष्टीचा मूलभूत हक्क आहे नव्हे तर अधिकारच. त्यातच या प्रजोत्पादनाच्या कार्यात ज्याप्रमाणे योग्य वयात आल्यावर पशूपक्षी व सुष्टीतील घटक आपल्या हातून मुलांना जन्म देतात. त्यांना मोठे करतात व ती लहानाची मोठी झाली की त्यांच्यावर अधिकार न गाजवता त्यांना त्याच्या स्वतःवर आत्मनिर्भर करुन सोडून देतात. ते जीव मग कोठेही जावो. त्यांची पर्वा करीत नाहीत. मग एखाद्यावेळी त्यांना कमीजास्त झाले तरी वा ते मृत्यू पावले तरी त्यांना बरेचदा शोक नसतोच. कारण त्यांना बुद्धी ही कमी आहे. पण मानवाचं वेगळं आहे. या माणसाला बुद्धी आहे. त्यानुसार तो विचार करीत असतो. त्याला काय करावे काय नको असं वाटायला लागतं. त्यातूनच जेव्हा ते वयात येतात. त्यावेळी ते विवाह करतात. मुलंही पैदा करतात आणि त्यांना मोठेही करतात. त्यातच त्यांना बुद्धी असल्यानं त्या जन्माला घातलेल्या वंशजांनी आपल्याला पोसावं अशी अपेक्षा बाळगून ते मार्गक्रमण करीत असतात.
ही जीवनाची साखळी आहे. एक जीव, त्याच्यापासून दुसरा नवीन जीव. त्याच्यापासून परत दुसरा जीव. त्यांनी मुलं पैदा करतांना व मोठी करतांना त्यांनी आपल्याला पोसावं ही अपेक्षा. पण कधीकधी भ्रमनिराश होत असते मन. कारण या साखळीत मोठी झालेली ही मनुष्याची पिल्लं मायबापांना पोसतीलच असं नसतं.काही लोकं ही मुलांचा हव्यास करीत असतात. आम्हाला दोनपेक्षा जास्त मुलं हवीत असं ते मानत असतात. कारण ती मुलं मोठी झाली की आपल्याला पोसतील. एकानं नाही पोसलं तर दुसरा पोसेल. कोणी ना कोणी पोसेल ही अपेक्षा. त्यातच मुलगी म्हटलं की पराया धन. ती पोसणारच नाही ही भावना. मग मुलगी झालीच की तिचा गर्भातच जीवघेणा खेळ सुरु होतो. त्यातच मुलीपेक्षा मुलांना जास्त पसंती दिली जाते. त्याची कारणंही तशीच आहेत. खरं तर मुलं हवी तरी कशाला? असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. मुले आधारवड म्हणून हवी असतात. खरं तर लोकांना मुलं ही आधारवड म्हणूनच हवी. कारण तरुणपणातील ठीक आहे. पण जेव्हा म्हातारपण येतं. तेव्हा मात्र त्यांना पोसावं म्हणून लोकांना मुलं हवी असतात. त्यांना वाटत असते की ही मुलं म्हातारपणात आमची सेवा करतील. आमचा आधारस्तंभ बनतील. वंश चालवतील. परंतू तसे होत नाही. काही मुलं ही आधारस्तंभ बनण्यासाठी मायबापाचे कर्दनकाळ बनतात व ते कोणत्या ना कोणत्या कारणावरुन मायबापाचा जीवही घेतात. विशेषतः आपल्या गरजा पूर्ण करीत असतांना.तो मध्यंतरीचा काळ. मुलांकडे मुलीच्या दृष्टीकोणातून जास्त पसंती होती. मुलाला वंशाचा दिवा समजण्यात येत असे. परंतू आता जो काळ बदलला आहे. त्या बदलत्या काळानुसार मुलाला वंशाचा दिवा समजत नाही तर मुलीलाही लोकं पसंती दाखवत आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की आज मायबापाच्या म्हातारपणी मायबापाचा वंशाचा दिवा वा आधारवड बनण्याऐवजी मुले आपल्या सासूच्या घरी जात असतात. ते मायबापाची सेवा करीत नाही. उलट मुलगी ही आपल्या मायबापाचा आधारवड बनते. मायबापाची सेवाही करते. ती आपल्या पतीच्याच घरी राहात नाही तर आपल्या मातापित्यालाही वेळोवेळी मदत करते.
आताचा काळ असा आहे की मुलगा आणि मुलगी असा लोकं भेदाभेद करीत नाहीत. ते असा भेदभाव न करता मुलगी असो वा मुलगा जन्म झाला की एकसमान प्रेम करतात. पण काही लोकं आजही असे प्रेम करीत नाहीत. ती मुलगी कितीही सेवा करीत असेल मायबापाची तरी मुलगाच बरा असता असे मानतात, तसं म्हणूनही दाखवतात. मुलगी झाली की शोक मनवतात. मुलं ही असावीत. मुलं जन्माला घालणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पशूपक्षालाही मुलं जन्माला घालता येतात नव्हे तर ती घालत असतात. मग या ठिकाणी हा माणूस आहे. त्यालाही मुलं जन्माला घालण्याचा अधिकार तेवढाच. तेव्हा आजच्या काळातील परिस्थीती लक्षात घेता मुलं जन्माला घालणे गरजेचे आहे.मुख्यत्वे सांगायचे झाल्यास मायबाप विवाह होताच मुलं जन्माला घालतात. तरुणपण हे चांगलं आनंदात जात असते. पण जेव्हा ते म्हातारे होतात आणि त्यांच्या मुलांचे विवाह होतात आणि ती मुलं जेव्हा मायबापाची सेवा करीत नाही. तेव्हा मात्र त्यांना चुकल्याचुकल्यासारखं वाटतं. त्यांना वाटायला लागतं की आपण मुलं ही जन्माला घातली नसती तर बरं झालं असतं.आज लोकं मुलं जन्माला घालतात. पण त्यांची अवस्था ही पशूपक्षांच्या मुलांसारखी आहे. ती मुलं शिकतात. मोठी होतात. विवाहबद्ध होतात व पशूपक्ष्यांच्या मुलांसारखी उडून गेल्यासारखी वागत असतात. ती देशात शिकतात व विदेशात कामाला लागतात. मग हळूहळू त्यांना मुलं होतात. ती आपली पत्नी व मुलांमध्ये रमतात. त्यातच आपल्याला जन्म देणारे कसे आहेत. हे सारं काही विसरतात. मायबाप मरतातही. त्यांना माहितीही होतं. पण आपल्याला वेळ नाही वा आपल्याला माहितच नाही असा विचार करुन ते मयतीतही येत नाही. शेवटी त्यांना जेव्हा आठवण येते. तेव्हा वेळ निघून गेलेली असते.
सर्वसामान्य लोकांचं ठीक आहे. मुलं हवीत. आपली आधारवड बनावी म्हणून. पण जी मुलं अशी संकटांच्या वेळी वा म्हातारपणी सेवाच करीत नसतील तर अशी मुलं कोणत्या कामाची? त्यापेक्षा आपण वांझ असतो तर बरं झालं असतं असं काही लोकांना वाटायला लागतं.त्यांचंही बरोबरच असते. कारण सर्वात जास्त मुलांची गरज पडते. ती म्हातारपणीच. ज्यावेळी हातपाय थकलेले असतात. पायात चालण्याचं वा उभं राहण्याचं बळ नसतं. कँल्शीअम कमी असल्यानं हाडं ठिसूळ झालेली असतात. आजारपण पाचवीला रुजलेलं असतं. रुग्णालयात वारंवार भरती व्हावं लागतं. अशावेळी गणगोताचा मेळा जर आपल्या भोवताल उभा असेल तर सारंच काही मिळविल्याचं समाधान आपल्याला मिळत असतं. तसंच प्रत्येक मुलांनी आज वागण्याची गरज आहे.म्हातारपण मिळावं. पण गणगोताचा मेळा आपल्या भोवताल मिळत असेल तर……जर मिळत नसेल तर उगाच म्हातारपण मिळू नये. नाहीतर मुले हवी कशाला असे म्हणण्याची वेळ येईल ही शक्यता नाकारता येणार नाही.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 10, 2021, 5:01 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY