आश्चर्यच! कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर शरीराला आले चुंबकत्व?
नाशिक : कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर सिडको भागातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या अंगाला लोखंड आणि स्टीलच्या वस्तू चिकटू लागल्या आहेत. सिडकोतील शिवाजी चौकात राहणारे अरविंद जगन्नाथ सोनार यांच्या बाबतीत हा प्रकार घडला असून वैद्यकीय तज्ज्ञदेखील गोंधळात पडले आहेत.
अरविंद सोनार यांच्या शरीरावर कुठल्याही धातूच्या वस्तू थेट चिटकत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.अरविंद सोनार यांनी ९ मार्च रोजी सपत्नीक कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला आणि त्यानंतर २ जून रोजी दुसरा डोस घेतला. त्यानंतर लस घेतल्यावर चुंबकत्व निर्माण होते असे समजल्यावर त्यांनी स्वतः प्रयत्न करून बघितला. तर त्यांना घरातील लोखंडाच्या आणि स्टीलच्या वस्तू, नाणे चमचे शरीरावर चिकटून राहात असल्याचे लक्षात आले. या संदर्भात तपासणी करूनच प्रतिक्रिया देऊ असे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
हा नक्की काय प्रकार आहे?
“मी लस घेतल्यानंतर हा प्रकार घडतो आहे. यापूर्वी माझ्या आयुष्यात अशा कोणत्याही वस्तू माझ्या अंगाला चिटकत नव्हत्या. हा नक्की काय प्रकार आहे? याबद्दल मी डॉक्टरांचा सल्ला घेणार आहे” असे अरविंद सोनार, यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 10, 2021, 3:29 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY