Breaking News

VIDEO: पाकिस्तानात भीषण अपघात; 2 प्रवाशी गाड्यांची टक्कर; 30 ठार, 50 पेक्षा जास्त जखमी

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: June 7, 2021 2:18 pm
|

पाकिस्थानमध्ये सोमवारी पहाटे मोठा रेल्वे अपघात सिंधमधील डहारकी भागात झाला असून यामध्ये दोन पॅसेंजर गाड्यांची टक्कर झाली. ही घटना घोटकीजवळील रेती ते डहारकी रेल्वे स्थानकादरम्यान पहाटे 3:45 वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मिलत एक्सप्रेस कराचीहून सरगोधाकडे तर सर सय्यद एक्सप्रेस रावळपिंडीहून कराचीकडे जात होती.पाकिस्तानी माध्यमांच्या म्हणण्यानुसार, ही घटना 3.30 ते 4 वाजे दरम्यान घडली.

दरम्यान, यामध्ये आतापर्यंत 30 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 50 पेक्षा जास्त प्रवाशी गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.मिळलेल्या माहितीनुसार, मिल्लत एक्स्प्रेस ट्रॅकवरुन धावत असताना त्याच्या बोगी नियंत्रणाबाहेर जात दुसर्‍या ट्रॅकवर पडल्या. त्यामुळे समोरून दुसऱ्या रुळावरुन येणारी सर सय्यद एक्स्प्रेस त्यांच्याशी धडकली आणि हा अपघात घडला. या अपघातामुळे बोग्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.हा अपघात मिल्लत एक्स्प्रेस आणि सर सय्यद एक्सप्रेसमध्ये झाला आहे. त्यामुळे आणखी जास्त प्रवाशी बोगींमध्ये अडकले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातामुळे या मार्गावरील बहुतांश रेल्वेंच्या हालचालीवर परिणाम झाला आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: June 7, 2021, 2:18 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *