आदिवासी समाजाचे नेतृत्व हरपले , माजी आमदार शंकर नम यांचे आज हृदयविकाराने निधन
पालघर : आदिवासी समाजाचे नेतृत्व करणारे माजी आमदार शंकर सखाराम नम (७२) यांचे आज(शनिवार)हृदयविकाराने निधन झाले. शुक्रवारी त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना जुपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुलं, मुलगी असा परिवार आहे.
शंकर सखाराम नम हे तीन वेळा डहाणू मतदारसंघाचे आमदार एक वेळा खासदार दोन वर्षे ठाणे जिल्हा पालकमंत्री व उपमंत्री होते. ठाणे जिल्हातील तवा या गावातुन त्यांनी सरपंचपदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती ते डहाणू पंचायत समितीचे सदस्य होते. तत्कालीन डहाणू विधानसभेचे आमदार भाई कडू यांच्या निधनानंतर त्यांना काँग्रेसकडून आमदारकीचे तिकीट मिळाले व त्यांनी सुमारे १७ वर्षे डहाणू विधानसभेचे प्रतिनिधित्व केले. काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणे पसंद केले. लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीत अॅड. चिंतामन वनगा यांनी नम यांचा पराभव केला. नंतर त्यांनी दोनवेळा डहाणू विधानसभेची निवडणूक लढवली मात्र दोन्ही वेळेस त्यांना पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान,तळागाळातील आदिवासी समाजाचा नेता काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाने पालघर जिल्ह्यात सर्वत्र दुःख व्यक्ते केले जात आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 5, 2021, 6:28 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY